नागरिकांना ‘डिजिटल सापळ्यात’ पकडले

मुंबई : प्रतिनिधी
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवर ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ अर्थात सोप्या भाषेत युपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, ‘डिजिटल सापळा’ लावल्याचा आरोप केला आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नुसार, १५ ऑक्टोबरपासून ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ या रिअल-टाइम डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे व्यापा-यांना (मर्चंट्सना) केल्या जाणा-या २,००० रुपयांवरील पेमेंट्सवर ०.४ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. मात्र युपीआय पेमेंट्सवर चार्जेस लागणार असल्याचे समोर येताच विरोधक आक्रमक झाले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. २१ ऑगस्ट २०२२ ला सरकारने युपीआय व्यवहारांवर कुठलंही शुल्क असणार नाही,

असे घोषित केल्याचा पुरावा देत राज ठाकरे यांनी भल्या मोठ्या पोस्टमधून टीका केली आहे.
आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसे डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवत युपीआय व्यवस्था आणली. मग त्याचा गाजवजा केला, स्वत:ची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि अचानक एकेदिवशी घोषित करून टाकले की आता या व्यवहारांवर शुल्क लागेल. थोडक्यात नागरिकांना गुंगवत ठेवले आणि हळूच ‘डिजिटल सापळ्यात’ पकडलं. मी गेली अनेक वर्ष सांगतोय की गाफील राहू नका किंवा सगळे किती आलबेल आहे आणि किती छान सुरु आहे असं अजिबात मानू नका. तुमच्या दारांवर हे सरकार कधीतरी टकटक करणार. आणि त्याची सुरुवात झाली आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी युपीआय व्यवस्था आणली. तिला प्रतिसाद मिळेल असे बघितले आणि तिला प्रतिसाद मिळाला हे सगळं ठीक आहे. पण जर हेतू डिजिटल पेमेंट व्यवस्था आणून आर्थिक देवाणघेवाण सोपी करण इतका स्वच्छ होता, तर ज्या दिवशी या पेमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली तेंव्हाच ती चालत राहावी आणि सामान्य माणसांच्या खिशाला झटका बसू नये म्हणून तरतूद का नाही केली ? अशा पेमेंट व्यवस्थांसाठी दीर्घकालीन देखभाल असो की सायबर सुरक्षा असो यासाठी पैसा लागणार मग त्याची तरतूद अर्थसंकल्पात कायम स्वरूपी का नाही केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

स्वत:ची तिजोरी भरण्याचे काम
हा निर्णय घेताना केंद्र सरकारने कोणाशी सल्लामसलत केली, किंवा परदेशी कार्ड कंपन्या आणि जागतिक पेमेंट व्यवस्था यांची अस्वस्थता नव्हती असे सरकार ठाम सांगू शकेल ? उत्तर नाही असं आहे. सरकारवर कुठून तरी दबाव असेल, त्यांनी त्याचा फायदा स्वत:ची तिजोरी भरून काढायला वापरला, असे राज ठाकरे म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
00:00
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:18
Video thumbnail
Latur|मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग; तावरजा नदी खळखळून वाहू लागली!
03:35
Video thumbnail
Latur|राजा मणियार यांच्या आरोपांना मस्के बंधूंचा पलटवार; पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर
08:28
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूरकरांनो लक्ष द्या!बस स्टँड ते शाहू कॉलेज मार्ग बंद; वन वेची अंमलबजावणी सुरू
03:02
Video thumbnail
Latur|लातूर काँग्रेसची नवी कार्यकारणी मैदानात; दुष्काळाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका
04:08
Video thumbnail
Latur|महापुरुषांचा आदर्श घ्या आणि ध्येय निश्चित करा! – डीवायएसपी अक्षय जाधव
04:44

Latest news