तिरूपतीत लाडू बनवण्यासाठी; तुपाऐवजी पाम तेलाचा वापर

हैदराबाद : वृत्तसंस्था
देश-विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसाद तयार करण्यासाठी शुद्ध तुपाऐवजी पाम तेलाचा वापर होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करत सुकृती फूड्सचे प्रमोटर कैलास चंद मंगला यांना अटक केली आहे.

ईडीच्या हैदराबाद विभागाने मनी लॉण्डरिंग प्रकरणी ही कारवाई केली असून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
तिरुपती देवस्थानमला ऍगमार्क स्पेशल ग्रेड गायीचे तूप म्हणून पुरवठा केला जात होता. मात्र, प्रत्यक्ष तपासात हे तूप रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल तेल, पालमोलीन आणि विविध रसायनांच्या मिश्रणातून तयार केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एम-९०, मोनोग्लिसराइड्स, मायव्हासेट सॉफ्ट ४०० आणि अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड एस्टर या घातक घटकांचा समावेश होता.

तपास यंत्रणेनुसार २०१९ ते २०२४ या काळात तिरुपती देवस्थानला सुमारे २३० कोटी रुपयांच्या बनावट तुपाचा पुरवठा झाला आहे. यातील एकट्या कैलास मंगला याने आपल्या कारखान्यात ९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप बनवल्याचा आरोप आहे. मंगला याने भेसळीचे साहित्य मिळवून देऊन स्वत:च्या कारखान्यात हे बनावट तूप तयार केले. कैलास मंगला याने हे भेसळयुक्त तूप थेट न पाठवता विविध शेल कंपन्यांच्या आडून देवस्थानला पोहोचवले. यामध्ये ‘श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज’, ‘मलगंगा मिल्क अँड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स’ आणि ‘ए.आर. डेअरी फूड्स’ या कंपन्यांचा समावेश होता. एवढेच नाही तर रिफाइंड पाम तेल आणि तुपाच्या खरेदी-विक्रीची खरी माहिती लपवण्यासाठी मंगला याने खोटया नोंदी आणि बनावट कागदपत्रे तयार केली होती. बनावट तूप हे अस्सल गायीचेच तूप आहे असा आभास निर्माण करण्यासाठी त्याने हा बनाव रचला होता.

यापूर्वीही झाली होती कारवाई
दरम्यान, यापूर्वी ईडीने याच प्रकरणात ‘भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी मिल्क’चा प्रमोटर आणि संचालक विपिन जैन याला अटक केली होती. आता मंगलाच्या अटकेमुळे या आंतरराज्यीय भेसळ रॅकेटचा पर्दाफाश झाला असून ईडी या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:18
Video thumbnail
Latur|मध्यरात्री पावसाची तुफान बॅटिंग; तावरजा नदी खळखळून वाहू लागली!
03:35
Video thumbnail
Latur|राजा मणियार यांच्या आरोपांना मस्के बंधूंचा पलटवार; पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर
08:28
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूरकरांनो लक्ष द्या!बस स्टँड ते शाहू कॉलेज मार्ग बंद; वन वेची अंमलबजावणी सुरू
03:02
Video thumbnail
Latur|लातूर काँग्रेसची नवी कार्यकारणी मैदानात; दुष्काळाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका
04:08
Video thumbnail
Latur|महापुरुषांचा आदर्श घ्या आणि ध्येय निश्चित करा! – डीवायएसपी अक्षय जाधव
04:44
Video thumbnail
Latur|अंधारात अजगराचा थरार! सेलूत सर्पमित्राने केली सुरक्षित सुटका
01:52

Latest news