नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून २,००० पेक्षा जास्त रकमेच्या वढक व्यवहारांवर ०.४% मर्चंट डिस्काउंट रेट (युपीआय एमआरडी ) लागू करण्याची घोषणा केली आहे. तथापि, युपीआय एमआरडी शुल्क लागू होण्यापूर्वीच, त्याचा लक्षणीय परिणाम जाणवू लागला आहे. या शुल्कामुळे पेट्रोल पंपांवर आता एक वेगळेच चित्र दिसत आहे.
अनेक पेट्रोल पंपांवर रोख पेमेंटचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत आणि पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी येणा-या ग्राहकांना २,००० हजारा पेक्षा जास्त पेमेंट न करण्यास स्पष्टपणे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर, ग्राहक इंधनासाठी ऑनलाइन पेमेंट घेणेही टाळत आहेत. ऑनलाइन पेमेंटऐवजी रोख पेमेंटला प्रोत्साहन देणारे पोस्टर्स लावले जात आहेत. केंद्र सरकार युपीआय वापरून होणा-या २,००० हजार पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर एमआरडी कर लावण्याच्या तयारीत आहे आणि हा नवीन नियम ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर, आता पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशन्सवर रोख पेमेंटचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
पेट्रोल पंप चालकांनी सांगितले आहे की, हा कर ऑक्टोबरमध्ये लागू होईल. त्यामुळे, ते सध्या यूपीआयद्वारे पेमेंट स्वीकारत आहेत. मात्र, लोकांना याची जाणीव झाल्यामुळे, ते या रकमेपेक्षा जास्त रकमेचे यूपीआय पेमेंट टाळत आहेत. त्यांच्या मते, यूपीआय पेमेंटबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.ऑक्टोबरपासून लागू होणा-या यूपीआय एमडीआरबाबत त्यांना अद्याप स्पष्ट सूचना मिळालेल्या नाहीत. तथापि, काहींनी आधीच रोख पेमेंट स्वीकारण्यास सुरुवात केली आहे आणि रोख पेमेंटबद्दल माहिती देत आहेत.
फटका सर्वसामान्यांना
व्यापा-यांवर कोणताही परिणाम झाला, तर त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल, कारण व्यापारी स्वत:च्या खिशातून कोणताही कर भरत नाहीत. ते म्हणाले की, भविष्यात खाद्यपदार्थांच्या किमती वाढतील. जनतेचे म्हणणे आहे की, सरकारने अचानक असा कर लादू नये. सरकारने याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.
















