नागरी सहकारी बँकांना आता मिळणार परवाने

भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला निर्णय

नागपूर : प्रतिनिधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहकारी बँकिंग क्षेत्रासंदर्भात एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गेली २४ वर्षे नव्या नागरी सहकारी बँकांना रिझर्व बँकेकडून परवाने दिले जात नव्हते. मात्र, आता आरबीआयने नव्या नागरी सहकारी बँकांना परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरातसारख्या सहकारी चळवळ बळकट असलेल्या राज्यांत मोठ्या संख्येने नव्या नागरी सहकारी बँका उदयास येण्याची शक्यता वाढली आहे.

गेली काही दशक सहकारी बँकिंग क्षेत्रात होणारे घोटाळे आणि एकानंतर एक नागरी सहकारी बँकांवर आरबीआयकडून निर्बंध लावण्यात आले होते. नव्या नागरी सहकारी बँकांसाठी परवाने देताना अत्यंत काटेकोर निकष लावण्यात आले आहेत. आता नव्या नागरी सहकारी बँकेसाठी परवाना मिळवण्यासाठी अर्ज करणारी संस्था मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अ‍ॅक्ट २००२ अंतर्गत नोंदणीकृत असणे बंधनकारक असेल. ती पतसंस्था किमान १० वर्षांपासून कार्यरत असावी. पतसंस्थेकडे किमान १० हजार कोटी ठेवी आणि ३०० कोटी निव्वळ मालमत्ता असणे आवश्यक आहे. तसेच मागील पाच वर्षांतील आर्थिक कामगिरी सातत्यपूर्ण आणि समाधानकारक असावी. पतसंस्थेतील कोणत्याही एका संचालकाचे किंवा सदस्याचे भागभांडवल ५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, अशा अटी आहेत. रिझर्व्ह बँक प्रथम अर्जांची प्राथमिक छाननी करेल. पात्र अर्जदार संस्थांची सखोल तपासणी आणि आर्थिक पडताळणी करेल. त्यानंतर रिझर्व्ह बँकेची इंटरनल स्क्रीनिंग कमिटी अर्जांचे परीक्षण करून शिफारस करेल. त्यानंतर रिझर्व्ह बँकेची कमिटी ऑफ द सेंट्रल बोर्ड अंतिम निर्णय करेल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news