भारतात रोजगाराचे मार्ग बंद, राहुल गांधींचा तरुणाईशी संवाद
प्रयागराज : वृत्तसंस्था
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रयागराजमध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमात तरुणाईला संबोधित केले. आज मी तुमच्यासोबत वेदना, डेटा आणि दौलत यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलो आहे. भारताकडे जगातील सर्वांत मोठी युवा शक्ती आहे. हे देशाचे सामर्थ्य आहे. अमेरिका, रशिया आणि चीनची चर्चा होते. परंतु ते भारताच्या तरुणाईपुढे काहीच नाहीत. मात्र, देशात या तरुणाईसाठी रोजगाराचे मार्ग बंद झाले असून, १ हजार तरुणांमागे फक्त १२ जणांना कायमस्वरुपी नोकरी मिळत आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.
विद्यार्थी अभ्यास करतात, शिक्षण घेतात पैसे खर्च करतात. मात्र, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. आज जगात तुम्ही मेड इन चाइना, मेड इन बांग्लादेश दिसेल. मात्र, मेड इन इंडिया दिसत नाही. याचे कारण नोटबंदी आणि चुकीच्या प्रकारे लागू करण्यात आलेली जीएसटी हे आहे. यामुळे व्यापा-यांचे खूप नुकसान झाले आहे. सरकारी नोक-यांचे पेपर लीक होतात. १५० तरुणांपैकी केवळ एका युवकाला नोकरी मिळते, असे राहुल गांधी म्हणाले.
भारताची ताकद युवक आहेत, तेच भारताची शक्ती आहेत. मी भारतातील प्रत्येक नागरिक आणि युवकाची गोष्ट सांगत आहे. देशातील ४० कोटी युवक भारताची सर्वांत मोठी ताकद आहे. अमेरिका, चीन आणि रशियातील कोणीही भारताच्या युवकांच्या सामर्थ्याचा सामना करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.
युवकांच्या डेटाशिवाय
एआयला अर्थ नाही
भारताकडे युवक आहेत आणि त्यांच्याकडे सर्वाधिक डेटा आहे. तुमच्या डेटाशिवाय एआयला काही अर्थ नाही. इंजिनिअरिंग, मेडिकल शिक्षणासाठी पैसे खर्च केले जातात. मात्र, या प्रमाणपत्रांचा कोणताही अर्थ नाही. कारण ही प्रमाणपत्रे तुम्हाला रोजगार देऊ शकत नाहीत. मीडियात एआयची चर्चा होते. मात्र, आपल्या डेटाशिवाय एआयला काही अर्थ नाही. एआय आपल्या डेटावरच बनले
















