निलंगा : प्रतिनिधी
ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट संघटनेने एक दिवसीय संप पुकारला होता. यात निलंगा तालुक्यातील सर्वच औषधी व्यवसायीकानी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवून केंद्र सरकारकडे आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
देशात ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात औषध विक्री केली जात आहे. यात नकली औषध विकली जात आहेत. शिवाय कॉर्पोरेट कंपन्या ऑनलाईन व्यवसाय क्षेत्रात उतरल्याने भारतीय औषधी व्यवसाय अडचणीत आला आहे. ऑनलाईन औषध विक्रीने सामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे. औषधी फार्मासीस्टच्या देखरेखीखाली विकली जावीत असा कायदा आहे पण ऑनलाईन विक्रीतून कायदा मोडला जात आहे. या अशा जिवघेण्या ऑनलाईन विक्रीस बंदी घालावी. कोरोना काळात केलेली औषधाबाबतचे कायदे रद्द करावे यासह अन्य मागणी यासाठी दि २० मे २०२६ रोजी केमिस्ट संघटनेने भारत बंद पुकारला होता. या बंदमध्ये निलंगा शहर व तालुक्यातील तब्बल २५० केमिस्ट बांधवांनी आपली व्यावसायिक दुकाने पूर्णपणे बंद ठेवून संपात सहभाग नोंदवत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली.
केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी करून उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ओम बाहेती, तालुकाध्यक्ष बालाजी थेटे, उपाध्यक्ष सोमनाथ आगरे, उपाध्यक्ष वैभव पाटील, सचिव राजेंद्र धुत, बाबुराव महाजन, हंसराज शिंदे, विकास साळुंके, मनोज पाटील, दत्ता पाटील, किशन बाहेती, भाग्यश्री मांजरीकर, सुप्रिया नाईकवाडे, कालिदास पाटील, प्रमोद जाधव, भगवान लड्डा, भगवान बोलसुर, विशाल नेलवाडे, सचिन जगताप, अजय पेठकर, हर्षवर्धन सातपुते, अभिषेक गडीकर, अजिम बागवान, खादीम जिय्या असिम पांढरे, नागेश चव्हाण, जेठ्ठी अनिल शेखर पौळ, प्रवीण वाघमारे, सतिश चाकोते, अमर तांदळे, प्रसाद चव्हाण, शुभम कांबळे, राजेश घायाळ आदी उपस्थित होते.
















