उदगीर : प्रतिनिधी
अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत असलेल्या साहित्य भारतीच्या उदगीर तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यीका व कवयित्री सुनंदा सरदार यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी निवृत्त मुख्याध्यापिका तृप्ती पंडित, व्यंकट कंदकुरे, जिल्हा मंत्रीपदी निवृत्त मुख्याध्यापिका शिवनंदा सोलापुरे, कोषाध्यक्षपदी मयूर कुलकर्णी, लोकसाहित्य कार्यपदी -अॅड. अश्विनी कुलकर्णी, बालसाहित्य कार्य-कल्पना नळगीरकर, महिला साहित्यीक अश्विनी निवर्गी, प्रचार समाज माध्यम-व्ही. एस. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. साहित्य भारतीच्या माध्यमातून साहित्यीक चळवळीला नवसंजीवनी, नवोदित साहित्यीकांना व्यासपीठ मिळवून देणे असे राबविण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष सुनंदा सरदार म्हणाल्या.
















