पराभवाच्या वेदना अथांग, जखम भरायला वेळ लागेल; लिओनेल मेस्सीची इमोशनल पोस्ट!

ब्युनोस आयर्स : संपूर्ण स्पर्धेत अवघा एक गोल गमावलेल्या स्पेनचा अभेद्य बचाव लिओनेल मेस्सीलाही भेदता न आल्यामुळे सलग दुसरा विश्वचषक जिंकण्याचे अर्जेंटिनाचे स्वप्न अंतिम टप्प्यावर येऊन भंगले. या पराभवानंतर मेस्सीने इन्स्टाग्रामवर इमोशनल पोस्ट केली. ३९ वर्षांच्या मेस्सीने हा त्याचा शेवटचा विश्वचषक असल्याचे संकेत आधीच दिले होते. मेस्सीच्या काळात फुटबॉल चाहत्यांनी मैदानावर अनेक चमत्कार पाहिले.

मेस्सीने २०२२ विश्वचषक, २००८ बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक, २०२१ आणि २०२४ कोपा अमेरिका विजेतेपदासह १९ वर्षांत १६ वेळा अर्जेंटिनाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे.
मेस्सीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, वेदना अथांग आहे आणि ही जखम भरायला वेळ लागेल. मात्र, या प्रवासातील सर्व चांगल्या आठवणी जपून ठेवण्याचा मी निर्णय घेतला आहे. सर्वस्व पणाला लावून

आम्ही जिंकलेले सामने आणि आयुष्यभर स्मरणात राहतील असे क्षण मी कायम जपून ठेवेन. संपूर्ण देशाने दिलेला पाठिंबा मी कधीही विसरणार नाही. संघातील प्रत्येक खेळाडूच्या मेहनतीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे अर्जेंटिनाने पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम संघांमध्ये आपले स्थान निर्माण केले. आज आम्ही जे काही साध्य केले आहे, त्याचे कौतुक करणेही कठीण आहे. या संघाने सलग दोन विश्वचषकांच्या अंतिम फेरीत धडक मारली, हीच मोठी कामगिरी आहे. प्रत्येक शुभेच्छा आणि संदेशाबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा आम्ही एक देश म्हणून एकत्र आलो आणि अर्जेंटिनाचा नागरिक असल्याचा अभिमान बाळगत एकजूट झालो. तसेच, विश्वचषक जिंकल्याबद्दल स्पेनचेही अभिनंदन.

सोमवारच्या पहाटेपर्यंत रंगलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फेरान टोरेसने १०६व्या मिनिटाला गोल करून स्पेनला १६ वर्षांनंतर विश्वविजेता बनवले, या विश्वचषकातील त्याचा हा पहिला गोल आयुष्यातील सर्वांत अमूल्य गोल ठरला. या गोलने स्पेनला ट्रॉफी मिळवून दिली. दुसरीकडे, या सुंदर खेळातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेस्सीला डोळ्यांत निराशेचे अश्रू साठवून निरोप घ्यावा लागला. प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या अर्जेंटिनाच्या समर्थकांकडे पाहत तो म्हणाला, ‘मला खूप दु:ख होत आहे. पण, प्रामाणिकपणे सांगायचे तर, प्रतिस्पर्धी संघ अधिक चांगला खेळला. आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:28
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20

Latest news