पुढच्या दोन दिवसांत दुष्काळसंदर्भात जीआर काढतोय; मुख्यमंत्र्यांची लातूरमध्ये मोठी घोषणा

लातूर : प्रतिनिधी
शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. मराठवाड्यात, विशेषत: लातूरमध्ये, १९७२ नंतर भीषण दुष्काळी परिस्थिीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकार सरसकट मदत करणार आहोत. येत्या दोन दिवसांत दुष्काळ निवारणासाठी शासन जीआर काढणार असून, रबी पिकांनाही मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली. लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज (ता.२३) सकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले. यानंतर त्यांनी औसा व निलंगा या दोन्ही तालुक्यांमध्ये पाहणी केली. औसा तालुक्यातील खरोसा येथे दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांशी संवाद साधत असताना शेतक-यांना तातडीने मदतीचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूरच्या दौ-यावर आहेत. औसा आणि निलंग्यात शेतक-यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री पाहणी करत आहेत. शेतक-यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना येत्या दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढणार असल्याची घोषणा केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जलसंधारणाची कामे हाती घेणार आहोत. रोजगार निर्मितीचीही कामे हाती घेणार आहोत. या संकटात तुम्ही एकटे नाही. आम्ही सर्व शक्तीने तुमच्यासोबत आहोत. आपण कर्ज माफी केली. ४८ हजार कोटींचं जुन लाईट बील माफ केलं. हे बील कधीच वसूल करण्यात येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभही देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक तेवढा ­निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज औसा तालुक्यातील खरोसा लामजना या भागात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचे पाहणी करण्यासाठी आले होते या परिसरात त्यांनी खरोसा भागात करपलेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या शेतक-यांची देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले ,औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार ,माजी आमदार दिनकर माने यांच्यासह अधिकारी व या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित शेतक-यांनी शेतात करपलेल्या सोयाबीनच्या पेंड्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवल्या या सोयाबीनच्या करपलेल्या पेंढ्या मध्ये सोयाबीनची बीज दिसून येत नव्हते याबाबत शेतक-यांनी देवेंद्र फडणवीस यांना पंचनामे न करता शेतक-यांना तातडीने सरसकट मदत करावी अशी विनंती केली होती.

चारा, पाण्याचे सुक्ष्म नियोजन करणार
दुष्काळी परिस्थितीत आवश्यक असणारे पाणी, जनावरांचा चारा आदी बाबींचे सूक्ष्मा नियोजन करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. औसा व निलंगा या दोन्ही तालुक्यांमध्ये आमची पाहणी झाली आहे. लातूर जिल्ह्यात पडलाय केवळ ५० टक्के पाऊस पडलेला आहे त्यामुळे नदी नाले विहिरी पूर्ण पडल्यात आणि विशेषत: आम्ही बघितलं की सोयाबीनचा पीक पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट झालेले आहे. जनावरांकरता चा-याची व्यवस्था थेट मदत आणि त्यासोबत आमच्या शेतक-यांना अन्नधान्याची मदत आणि इतर सगळ्या प्रकारची मदत या दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

शासन तुमच्यासोबत
कर्जमाफीचं काम अजूनही सुरू आहे. जोपर्यंत कर्जमाफीचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. कर्जमाफीचे पैसे देऊ. दुष्काळाचे पैसे लवकरात लवकर खात्यात टाकू. १९७२ नंतर इतका मोठा दुष्काळ पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. मागच्या काळात ६४ टक्के पाऊस झाला होता. पण चिंता करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. जे चांगलं आहे ते करू. तुम्हाल मदत करणयात मागे पुढे पाहणार नाही. धीर ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं.
सर्वाधिक परिणाम लातूरवर
मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पण सर्वाधिक परिणाम लातूरवर झाला आहे. त्यातून आपण मार्ग काढणार आहोत. चारा आणि पाण्याचं नियोजन केलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीतून पाणी आणलं जाणार आहे. जी काही मदत लागेल ती आम्ही करणार आहोत. तुम्हाला आर्थिक मदत दिली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पंचनामे कायदा म्हणून करावे लागतात
आपल्या अडचणी वाढणार आहेत हे आम्हालाही समजत आहे त्यामुळे आम्ही तात्काळ ही मदत करतो आणि आता पंचनामे वगैरे आम्ही करतात पण पंचनामे कायदा म्हणून करावे लागतात बाकी तुमच्या नुकसान सरसकट झालेला आम्हाला दिसत आहे मग तशाच पद्धतीने सरसकट मदतच आम्ही करणार आहोत.

आपल्या सोबत सरकार संवेदनशील : आमदार अभिमन्यू पवार
औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी खरोसा पाच खेडी योजनेचा या ठिकाणी उल्लेख करत म्हणाले, शासनाच्या वतीने बिल भरून रखडलेल्या योजना सुरू करू आणि त्या पाणी जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो सरकार आपल्या सोबत या संवेदनशील आहे जे चांगल्या चांगल्या करता येईल ते आम्ही करू कुठेही मागे पुढे पाहणार नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE - एकमत कार्यालयातील गणरायाची आरती |EKMAT DIGITAL
12:44
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये सफाई कामगारांचा ‘झाडू मोर्चा’; ईपीएफची रक्कम देण्याची मागणी
02:02
Video thumbnail
Latur|शासन निर्णयाची होळी! ग्रामरोजगार सहाय्यकांचा थेट इशारा
03:28
Video thumbnail
Latur|तुटपुंजी मदत नको! शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी
06:34
Video thumbnail
Latur| देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी थेटच बोलले
10:40
Video thumbnail
CM Devendra Fadanvis|दोन दिवसांत जीआर! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा
05:52
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया| Ekmat Digital
12:19
Video thumbnail
🔴 LIVE मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी| Ekmat Digital
28:13
Video thumbnail
Latur|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
02:12
Video thumbnail
Latur|पाणी चोरी थांबवण्यासाठी मनपाची कारवाई; ग्रामस्थ आक्रमक
01:54
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
12:38
Video thumbnail
Latur|मोईजभाई शेख यांच्या निधनाने लातूर हळहळले; अंत्यदर्शनासाठी गर्दी
05:19
Video thumbnail
Latur|काँग्रेस-राष्ट्रवादीचे बेरोजगार आंदोलन करत आहेत’; अभिमन्यू पवारांचा दावा
10:32
Video thumbnail
Latur|उद्योजक अक्षय शाह यांच्या हस्ते एकमत परिवारातील श्रीगणेशाची आरती
04:04
Video thumbnail
Latur|ज्येष्ठ काँग्रेस नेते मोईजभाई शेख यांचे दुःखद निधन
01:29

Latest news