पुण्यात श्री गणेशाची प्रतिष्ठापना; वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

पुणे : प्रतिनिधी
मंगलमय,उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात व ढोल ताशाच्या निनादात श्री गणेशाचे आगमन पुण्यनगरीत झाले. अनेक गणेश मंडळांनी मिरवणूकीचे आयोजन केले होते. सकाळी घरोघरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली नंतर सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.गेल्या दोन चार दिवसांपासून बाजारपेठ विविध वस्तूंच्या खरेदीसाठी फुलली आहे.

फळे आणि फुलांच्या दरात वाढ तर साखर आणि गुळाच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असल्याचे दिसून आले.त्याचप्रमाणे सजावटीचे साहित्याच्या खरेदीसाठी उत्साह द्विगुणित झाला असल्याचे पाहावयास मिळाले.शहर आणि परिसरात तीन हजार पेक्षा अधिक मंडळांची संख्या आहे. पुण्यनगरीतील मानाच्या गणेश मंडळांनी सकाळी वाजत गाजत श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून निघालेल्या मिरवणुकीने वाजत गाजत वृंदावन मध्ये साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये श्री गणपती बाप्पा विराजमान झाले.

गणपती बाप्पा मोरया… चा जयघोष
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्तरप्रदेश वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना झाली. सकाळी मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून ‘श्रीं ’ची आगमन मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरया… चा जयघोष करत यावेळी गंधाक्ष ढोल ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:28
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20

Latest news