36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeपरभणीपोलिस महासंचालक पदकाने दिनेश स्वामी सन्मानित

पोलिस महासंचालक पदकाने दिनेश स्वामी सन्मानित

परभणी : येथील पोलिस दलात उत्कृष्ट सेवा बजावणारे पोलिस हवालदार दिनेश मन्मथ स्वामी यांना मा. पोलिस महासंचालक म. रा. मुंबई यांचे तर्फे परभणी पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन बुधवार, दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेसी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जिल्हा पोलिस दलात मागील अनेक वर्षापासून कार्यरत असलेले पोलिस हवालदार स्वामी (बक्कल नंबर ११८८) यांनी पोलिस दलात उत्कृष्ट सेवा बजावत अनेक गुन्ह्याची शिताफीने उकल करत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पोलीस दलाच्या वतीने दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांना सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल मित्र परिवारासह सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR