29.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयबिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला परवानगी

बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला परवानगी

मॉरिशससह विविध देशांत केली जाणार निर्यात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने तांदळाच्या निर्यातीच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला असून, बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. मॉरिशसला १४ हजार टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्याला मंजुरी देण्यात आली. तब्बल १० महिन्यानंतर केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे.

जुलै २०२३ मध्ये सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी अखेर उठवली आहे. भारतातून मॉरिशसला आता १४ हजार टन बिगर बासमती तांदळाची निर्यात होणार आहे. देशांतर्गत गरजा आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. दरम्यान, तांदळाची निर्यात ही नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड कडे देण्यात आली आहे.

तांदळाच्या निर्यातीच्या संदर्भातील माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने दिली. तब्बल १४ हजार टन तांदळाची निर्यात मॉरिशसला केली जाणार आहे. दरम्यान, मॉरिशसबरोबर इतरही अनेक देशांना तांदळाची निर्यात केली जाणार आहे. यामध्ये नेपाळ, कॅमेरून, कोटे डी आयव्होर, रिपब्लिक ऑफ गिनी, मलेशिया, फिलीपिन्स, सेशेल्स, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, कोमोरोस, मादागास्कर, इक्वेटोरियल गिनी, इजिप्त या देशांमध्ये देखील तांदळाची निर्यात केली जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR