भव्य आतिषबाजीने उजळला लातूरमधील महात्मा बसवेश्वर चौक

लातूर : प्रतिनिधी
जगतज्योती महात्मा बसवेश्वर महराज यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर चौक येथे नव्या एलईडी नामफलकाचे थाटामाटात अनावरण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, उपमहापौर अ‍ॅड.स्रेहलजी उटगे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यावेळी करण्यात आलेल्या भव्य आतिषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि उपस्थित नागरिकांनी जल्लोषात सहभाग घेतला. महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात उपाध्यक्ष विश्वास आंबेकर यांनी स्वखर्चातून एलईडी नामफलक उभारण्यासाठी मोठे योगदान दिले. शनिवारी रात्री मान्यवरांच्या उपस्थितीत या आकर्षक फलकाचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी आमदार अभिमन्यू पवार, काँग्रेसचे राज्य सचिव श्रीशैल्य उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, नगरसेवक विकास कांबळे, आदिती पाटील कव्हेकर, ऋषिकेश राजे, सत्यवती ताई चेवले, शोभाताई पाटील, संगीता मिरचे, राजश्री धोत्रे, राम स्वामी, श्रीकांत रांजणकर, ओमप्पा धरणे, अ‍ॅड. गंगाधरप्पा हामणे, बसवंतप्पा भरडे, बाबुअप्पा सोलापूरे, भीमाशंकर देवणीकर, विनय जाकते, मीनाताई गायकवाड आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अ‍ॅड. निलेश मुचाटे यांनी केले, तर सूत्रसंचालन ओमप्रकाश झुरळे व ओमकार मेंगशेट्टे यांनी प्रभावीपणे पार पाडले. आभार प्रदर्शन बसवेश्वर हेंगणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. निलेश मुचाटे, स्वागताध्यक्ष प्रा. भालचंद्र येडवे पाटील, उपाध्यक्ष विश्वास आंबेकर, सचिव बालाजी झिपरे, सहसचिव रोहीत चवळे, कोषाध्यक्ष लखन कावळे, कार्याध्यक्ष मुकेश उटगे, बालाजी पाटील रायवाडीकर, गणेश हेरकर, संयोजक नितीन मोहनाळे, जगदीश येरटे, सोमेश्वर ईश्वरशेटे, शिवकुमार रोडे, प्रमोद धुपे, लक्ष्मीकांत रासुरे, मन्मथ सोरटे, सुशील वेळापुरे, निखिल शेटकार, शरणाप्पा अंबुलगे, कल्याण लातूरे, सुनील ताडमाडगे, किरण खोबरे, सतीश पाटील, महेश आंबुलगे, बसवेश्वर हलकुडे, तानाजी झुंजे पाटील, दत्ता स्वामी, दत्ता चेवले, मनोज मोटे, अ‍ॅड. सचिन हुरदळे, प्रदीप उपासे आदींसह समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. या दिमाखदार सोहळ्यामुळे बसवेश्वर चौक नव्या एलईडी नामफलकामुळे अधिक आकर्षक बनला असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news