जौनपूर चकमक: नवरदेवाचा थरारक खून करणाऱ्या १ लाखाचा इनामी गुंड रवी यादवचा पोलिसांकडून खात्मा!

जौनपूर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वी महामार्गावर एका नवरदेवाची फिल्मी स्टाईलने गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. रवी यादव असे या कुख्यात गुंडाचे नाव असून, त्याच्यावर पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आज झालेल्या एका अटीतटीच्या पोलीस चकमकीत (Encounter) तो ठार झाला. या कारवाईत पोलिसांचे एक इन्स्पेक्टरही जखमी झाले आहेत.

महामार्गावर रचला होता रक्ताचा खेळ
१ मे रोजी आझाद बिंद नावाचा तरूण मोठ्या उत्साहात आपली बरात घेऊन निघाला होता. फुलांनी सजवलेल्या गाडीत नवरदेव बसलेला असतानाच, रवी यादव आणि त्याच्या साथीदारांनी हायवेवर गाडी अडवली. अगदी एखाद्या चित्रपटात शोभावा अशा पद्धतीने गाडीवर बेछूट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात काही सेकंदांतच फुलांनी सजलेली कार रक्ताने माखली आणि नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला. ज्या घरात लग्नाचे सनई-चौघडे वाजत होते, तिथे एका क्षणात आक्रोश पसरला. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला होता.

जुन्या वैमनस्यातून हत्येचा कट
पोलीस तपासात समोर आले की, मुलीचा एक नातेवाईक प्रदीप बिंद या लग्नाच्या विरोधात होता. त्यानेच आझादचा काटा काढण्यासाठी रवी यादव आणि भोला राजभर या गुंडांना सोबत घेऊन हा रक्तरंजित कट रचला होता. लग्नाआधी आझादला धमक्याही देण्यात आल्या होत्या.

अशी झाली पोलीस चकमक
नवरदेवाच्या हत्येनंतर फरार झालेल्या रवी यादवचा पोलीस कसून शोध घेत होते. आज पोलिसांना तो एका भागात लपल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी वेढा घालताच रवी यादवने पोलिसांवर बेछूट गोळीबार सुरू केला. पोलिसांनी स्वतःचा बचाव करत प्रत्युत्तरा दाखल गोळ्या झाडल्या. यात एक गोळी रवी यादवच्या जबड्याला लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या चकमकीत उत्तर प्रदेश पोलिसांचे एक इन्स्पेक्टरही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रदीप बिंद आणि त्याचा दुसरा साथीदार भोला राजभर हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. १ लाखाच्या इनामी गुंडाचा खात्मा केल्यामुळे जौनपूर पोलिसांनी मोठी कामगिरी फत्ते केली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news