26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरभाजपाच्या भूलथापांना बळी पडू नका

भाजपाच्या भूलथापांना बळी पडू नका

लातूर : प्रतिनिधी
जनसामान्यांशी नाळ तुटलेल्या भाजपाला काहींही करुन फक्त निवडणुक जिंकायची आहे. त्यामुळेच भाजपाचे नेते भूलथापा मारुन मतदान मागत आहेत. कामावर मत मागण्याऐवजी जाती-धर्माचे मुद्दे पुढे करुन सामान्य नागरीक, महिलांची दिशाभूल केली जात आहे. महिला भगिणींनी भाजपाच्या भूलथापांना बळी न पडता काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रचंड बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील पाखरसांगवी येथील तात्यासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी दि. ३० एप्रिल रोजी सकाळी आयोजित महिला मेळाव्यात श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख बोलत होत्या. यावेळी सुनिता अरळीकर, डॉ. सारीका देशमुख, सीमा क्षीरसागर, दैवशाला राजमाने, तात्यासाहेब देशमुख, अक्षय देशमुख यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना वैशालीताई देशमुख म्हणाले, काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर देशाचा सर्र्वांगीण विकास करण्यासाठी दिवसरात्र कठोर परिश्रम घेतले. देशासाठी काँगे्रस पक्षाने प्राणाची आहुती दिली. सर्व सामान्य माणुस केंद्रबिंदू माणुन काँगे्रस पक्षाने देशाचा विकास केला त्यामुळेच आज आपला देश सुपर पॉवर ठरत आहे. या उलट भाजपाने देशाच्या जडणघडणीत काहींही योगदान दिलेले नाही. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर बसून हुकूमशाही पद्धतीने वर्तणुक केली जात आहे. भाजपाला वेळीच धडा शिकविण्याची गरज असून त्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवजी काळगे यांचा प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.
या महिला मेळाव्यात सुनीता अरळीकर, दैवशाला राजमाने, राम चामे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन राम चामे यांनी केले. यावेळी राणाबाई सिंगन, विडाबाई सिंगन, अज्ञानबाई देशमुख, मिनाताई सूर्यवंशी, पुष्पा लखादिवे, रंजना सूर्यवंशी, कांताबाई सिंगन, शालूबाई सूर्यवंशी, महानंदा बोयणे, गोजरबाई जाधव, दैवशाला सुनापे, शुभांगी देशमुख, सुनंदा देशमुख, जयमाला देशमुख, रंजना देशमुख, मिना देशमुख, कौसाबाई गुंडेबोयने, सोमाबाई येरंडे, नाना देशमुख, सतीश सिंगन, रामेश्वर लखादिवे, लिंगप्पा कापसे, जावेद पठाण, सतीश लखादिवे, वजीर शेख, काकासाहेब देशमुख, राम वाघमारे, काशिनाथ बेलूरकर, सुभाष सिंगन यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR