लातूर : प्रतिनिधी
बैल पोळयाच्या निमित्त शिवछत्रपती मार्केट यार्डातील हमाल गाडीवानांना बैलपोळयाचे गोंडे, चंगाळे, मोरकी, कासरा, साखर, गुळ, चना दाळ, नारळ आदी साहित्याचे वाटप लातूर उच्चत्तम बाजार समितीचे सभापती जगदिश बावणे यांच्या हस्ते हमाल भवन येथे करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून संचालक पाटील, सचिव अरविंद पाटील, सुरेश धानुरे, माजी संचालक नागेश वाघमारे, जनसेवा संघटनेचे माणिक पाडूूळे, बालाजी कांबळे, बालाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी संचालक हर्षवर्धन सवई यांनी केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रज्जाक शेख, सचिव राहूल सुरवसे, भरत कांबळे, गोविंद गवळी, मुरली कांबळे, बशिर शेख, महादेव आरगडे, भालचंद्र राऊत, रोशन शेख, बाबासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
















