27.3 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeलातूरभाजपा सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

भाजपा सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

चाकूर : प्रतिनिधी
केंद्र सरकार फक्त मोजक्याच उद्योगपतीचे आहे. सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा काय आहेत. याकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे.आरक्षणासाठी सर्वच समाजाला आश्वासन देऊन ते आश्वासन पूर्ण करीत नाही. मराठा विरोधात ओबीसी असा संघर्ष निर्माण करण्यात आला आहे. शेतक-यांच्या उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नाही. हमीभाव देण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले.

आगरवाडी (ता.चाकूर) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी बंडाप्पा काळगे यांच्या प्रचारा निमित्ताने आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस भारतीय कॉंग्रेस चाकुर तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगीरे, शिवसेना उद्धव ठाकरे गट तालुका प्रमुख नंदकुमार पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव बुदरे, शहराध्यक्ष कॉंग्रेस पप्पू शेख, सलीम तांबोळी सोशल मिडीया प्रमुख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाबुमिया दापकेवाले, अहमदपूर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष निलेश देशमुख, युसुफ शेख, बाळू ईरवाने, सिरीज देशमुख,अभिमन्यू धोंडगे,अलगरवाडी,हणमंतवाडी,शिरनाळ, मष्णेरवाडी, ब्रम्हमवाडी, हणमंतवाडी तांडा, गावातील नागरिक उपस्थित होते.

विलासराव पाटील म्हणाले की, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर पाच गॅरंटी देण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनतेला केंद्र ंिबदू मानून विकास करण्यात येणार आहे. गरिब कुटुंबातील प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. शेतक-यांसाठी स्वामीनाथ आयोग स्थापन करण्यात येणार आहे. बेरोजगार तरूणांना ३० लाख नोक-या देणार आहे. महिलासाठी लखपती बनवले जईल अशा लोकाभिमुक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविल्या जातील. यावेळी महाविकास आघाडीतील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR