26 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूरविकासाबद्दल न बोलणा-यांना धडा शिकवा

विकासाबद्दल न बोलणा-यांना धडा शिकवा

लातूर : प्रतिनिधी
सत्ताधारी लोक लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. विकासावर बोलत नाहीत आपल्या मतदार संघातील काय काम केलं? यावर बोलत नाहीत पाच वर्षात एकदाही मतदारसंघातील विकासाचे काम तर सोडा साधे गावात सुधा फिरकले नाहीत, असा लोकांना या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवला पाहिजे. मागच्या १० वर्षात निलंगा विधानसभा मतदारसंघात विकासाचे काय काम केले ते स्थानीक लोकप्रतिनिधीनीही सांगावे, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री कोंग्रेसचे स्टार प्रचारक आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ संतोष कवठाळे हे होते. मंचावर कोंग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सचिव अभय साळुंके, राष्ट्रवादीचे डॉ बापूसाहेब पाटील, शिवसेनेच्या नेत्या डॉ शोभा बेंजर्गे, लोकसभा आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे, बंडाप्पा काळगे, डॉ अरंिवंद भातंब्रे आदि मान्यवर उपस्थित होते. निर्दयी सरकार केंद्रातील सरकार भाजपचे १० वर्षांपासून सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य माणूस महागाईच्या वणव्यात होरपळत आहे. महागाई वाढवली, पेट्रोल, डिझेलची दरवाढ केली. व्यापार थंडावला जीएसटी सुरू केली.

छोट्या व्यवसायिकांची पिळवणूक सुरू आहे. दंड व्याज वसूल करीत आहेत हे थांबाविण्यासाठी राहूल गांधी गॅरंटी इंडिया आघाडीकडे सत्ता द्या निश्चीतपणे आपले बुरे दीन जायेंगे इंडिया, आघाडी आयेगी आच्छे दीन लायेंगे हा आमचा विश्वास आहे नुकत्याच झालेल्या कर्नाटक, तेलंगणा राज्यात जी गॅरंटी कार्ड दिले होते त्या योजना काँग्रेसने सुरू केल्या आहेत. त्यामुळें लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण डॉ शिवाजी काळगे यांना त्यांच्या तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केले. यावेळी निरीक्षक संतोष देशमुख, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, राजकुमार पाटील, कल्याण बरगे, शिरूर अनंतपाळ काँग्रेस अध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस मीडिया सेलचे जल्हिाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, संजय बिराजदार, अजित माने मीनाताई बंडले, चक्रधर शेळके लक्ष्मण बोधले , शेळके, भिक्का ,सुधीर लखन गावे, अँड सुतेज माने,अनिल पाटील यांच्यासह साकोळ, जवळगा, सांगवी, घुगी, शेंद तीपराळ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR