26.6 C
Latur
Wednesday, March 4, 2026
Homeमहाराष्ट्रभाजप-एमआयएमची पुन्हा युती

भाजप-एमआयएमची पुन्हा युती

अमरावती : प्रतिनिधी
अकोल्यातील अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमच्या युतीने राज्यात खळबळ उडाली होती. नागरिकांचा संताप आणि विरोधकांच्या भूमिकेमुळे भाजपकडून हा निर्णय मागे घेण्यात आला होता. पण आता पुन्हा एकदा भाजप -एमआयएमच्या या अभद्र युतीचा नवा अंक सुरू झाला आहे. अमरावतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि एमआयएमकडून युती करण्यात आली आहे. या युतीनंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेने जोर धरला आहे. विरोधकांकडून या युतीवर टीका करण्यात आली आहे. भाजपकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. समितीच्या सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ मिळाली आहे. एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापतीपद मिळाले आहे. एमआयएमच्या ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ३ आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत जात सत्ता स्थापन करण्यात आली आहे. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमसोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

समितीच्या सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली. या युतीमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचे सभापतीपद देखील मिळाले. मात्र, या युतीची आता राज्यभर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

एमआयएमच्या ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या २ आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत गेला. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एमआयएम आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या आहेत. कधीही एमआयएम आणि भाजपा एकत्र येईल, असा साधा कोणी विचारही केला नाही. मात्र, अमरावतीच्या अचलपूरमध्ये हे प्रत्यक्षात उतरले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR