पुणे : प्रतिनिधी
राज्यभरातला मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसाचा मोठा फटका भाजीपाला उप्तादनाला बसलाय. कारण या पावसामुळे पीकं खराब झाली आणि बाजारात भाज्यांची आवकही घटली. तर पाऊस ओसरताना मागणी वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडलेले पाहायला मिळत आहेत. पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे.
रोजच्या आहारातल्या भाज्या घेणं आता सर्वसामान्यांसाठी कठीण होणार आहे. कारण हे दर दुप्पट झालेले आहेत. कारण जुन महिन्यात पाऊस पडलाच नाही. त्यामुळे जुलैच्या सुरुवातीच्या पडलेल्या पावसात शेतक-यांनी मोठ्या कसरतीने आपला भाजीपाला पिकवला होता. तर आता राज्यात भाज्यांचे दर पुन्हा कडाडले आहेत.
नाशिकमध्ये कोथिंबिरीच्या दरात मोठी वाढ
रविवारी बाजारसमितीत कोथिंबिरीला जुडीला २१० रुपये भाव मिळालाय. परराज्यात मोठी मागणी असल्यानं सध्या कोथिंबिरीचे भाव वधारलेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे नाशिकच्या शेतक-यांना मोठा फटका बसल्याचा दिसून येत आहे.
















