लोहा : प्रतिनिधी
लोहा शहरासह विविध गावांना पाणी पुरवठा करणा-या सुनेगाव तलावाची जीवनदायिनी म्हणून प्रसिध्द असलेल्या भीमा नदीला काल रात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे पूर आले असून नदी दुथडी वाहत आहे. त्यामुळे सुनेगाव तलाव भरला असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
















