33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमतदानाचा घसरलेला टक्का कुणाला धक्का देणार?

मतदानाचा घसरलेला टक्का कुणाला धक्का देणार?

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजता मतदानाची एकूण ६३.७१ टक्के इतकी आकडेवारी समोर आली आहे. गत निवडणूक सन २०१९ पेक्षा साधारण ५ ते ७ टक्के मतांची टक्केवारी कमी झाल्याची शक्यता आहे.

पाच वाजण्याच्या आत मतदान केंद्रात उपस्थित असणा-या नागरिकांना मतदान करण्याची मुभा असल्यामुळे रात्री उशिरा आकडेवारी समजेल. त्याचबरोबर २०१९ पेक्षा यावेळी मतदारसंख्या सुद्धा लाखाच्या पेक्षा जास्त वाढली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीत सर्वांत जास्त ७२.०४ टक्के इतके मतदान झाले होते. तर सन २०१९ ला ७०.७० टक्के मतदान झाले होते.

यावेळी २०२४ साली सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ६३.७१ टक्के मतदान झाले आहे. रात्री उशिरा एकूण आकडेवारी समजेल. साधारण गेल्या वर्षीपेक्षा ५ ते ७ टक्के कमी मतदान झाल्याचे दिसत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण, राधानगरी, कागल आणि करवीर मतदार संघाची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा जास्त होती. त्यामध्ये सर्वांत जास्त करवीर मतदारसंघात ७५.३९ टक्के मतदानाची टक्केवारी होती. मतदानाची कमी टक्केवारी कोणाला धक्का देणार तर कोणाला तारणार.. हे चार जूनला समजणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR