33.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रनवदाम्पत्याची कार पुलाला धडकून पाच जण जागीच ठार

नवदाम्पत्याची कार पुलाला धडकून पाच जण जागीच ठार

मोहोळ : लग्न कार्यानंतर ज्योतिबाचे दर्शन उरकून परतत असताना पोखरापूर (ता. मोहोळ) जवळ रस्त्याच्या कडेला सिमेंटच्या पुलास कार धडकून झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. यापैकी तिघांना उपचार करुन घरी पाठवण्यात आले तर दोघांवर उपचार सुरु आहेत. हा अपघात मंगळवार, ७ मे रोजी पहाटे २:३० वाजता झाला.
सोमनाथ शिवाजी डवरी (वय ४०), रेणुका सुरेश जोगी (वय ४५, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर), नवनाथ अनिकेत जाधव (वय ७ वर्षे, रा. कोर्टी, ता. पंढरपूर), सीता दिलीप कोष्टी (वय ५५), दिलीप हरिनाथ कोष्टी (वय ६०, दोघे रा. वडाळा) हे गंभीर जखमी होऊन मरण पावलेल्यांची नावे आहेत.

जखमी झालेल्यांमध्ये महेश दिलीप डवरी, अश्विनी अनिकेत जाधव, निकिता महेश डवरी, श्रावणी सुरेश डवरी, आकाश सुरेश जोगी यांचा समावेश आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयत उपचार सुरू असून यापैकी महेश डवरी, अश्विनी जाधव, निकीता डवरी यांना उपचार करुन घरी पाठवण्यात आले.
देवदर्शन आटोपून मंगळवारी पहाटे २:३० वाजता सारे जण कारमधून पंढरपूर- मोहोळ रोडवरून निघाले होते. कार पोखरापूरजवळ दळवे यांच्या शेतासमोर येताच ती एका सिमेंटच्या पुलाला धडकली.

याबाबत सुरेश शिवाजी डवरी (वय ४१, रा. वडाळा, ता.उ. सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून कार चालक अनिकेत जाधव याच्यावर मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी की, उतर सोलापूर तालुक्यात वडाळा येथील महेश दिलीप कोष्टी (वय २४, रा. वडाळा) याचे लग्नकार्य नुकतेच झाले. एका कार (एम.एच.१३ ई.सी. २८१९) मधून नव दाम्पत्य महेश कोष्टी, पत्नी निकिता महेश कोष्टी (वय १९), आई सीता दिलीप कोष्टी, वडिल दिलीप हरिनाथ कोष्टी, श्रावणी सुरेश डवरी (वय १६), आकाश सुरेश जोगी (वय २१, सर्व रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर), चालक अनिकेत अंकुश जाधव (वय २९), पत्नी अश्विनी अनिकेत जाधव (वय २५, दोघे रा. कोर्टी), मुलगा नवनाथ

जाधव, सोमनाथ डवरी, नातेवाईक रेणुका कासार हे सारे जण ज्योतिबाच्या दर्शनासाठी ५ मे २०२४ रोजी सायंकाळी कारमधून कोल्हापूर येथे गेले होते. अपघाताची माहिती मिळताच अपघात पथकाचे पोलिस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार आणि त्यांचे पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी जखमींना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले.तेथून त्यांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. कारचालक अनिकेत जाधव हा गंभीर जखमी झाला असून त्यास पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अधिक तपास अपघात पथकाचे पोलिस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR