30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमतदान केंद्रांवर आरोग्य साहित्य वाटप

मतदान केंद्रांवर आरोग्य साहित्य वाटप

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ७ मे रोजी होणार असून वाढता उन्हाळा लक्षात घेता निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणा-या मतदारांसाठी १ हजार ७२४ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण जिल्हा प्रशासनाने केले.

मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास प्राथमिक उपचार देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड विधानसभा मतदार संघासाठी २३२, इंदापूर २५२, बारामती २८०, पुरंदर २४४, भोर ५२५ व खडकवासला १९१ याप्रमाणे १ हजार ७२४ कीटचे वितरण केले.

तर २ हजार ५१६ मतदान केंद्रांना २५१६० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण केले. साहित्य व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयक अधिकारी रेश्मा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक समन्वयक अधिकारी सूर्यकांत पठाडे यांच्या उपस्थितीत मेडिकल किटचे वितरण करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR