30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeक्रीडामयंक आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून पडणार बाहेर ?

मयंक आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून पडणार बाहेर ?

नवी दिल्ली : लखनौ सुपर जायंट्सचा (एलएसजी) वेगवान गोलंदाज मयंक यादवला मंगळवारी मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्धच्या सामन्यादरम्यान पोटदुखीमुळे मैदान सोडावे लागले होते. दरम्यान मयंक आता आयपीएल २०२४ च्या सत्रामधील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान मयंकला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्या पुढील सामने खेळण्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या चार आठवड्यांत मयंकला दुस-यांदा दुखापत झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक यादवला या दुखापतीमधून पूर्ण बरे होण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागेल. बुधवारी त्याचे स्कॅनिंग करण्यात आले मात्र अहवाल येणे बाकी आहे.

वैद्यकीय पथकाने मयंक यादवला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. एलएसजीचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी स्टार वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या दुखापतीबाबत एक अपडेट दिले असून ते म्हणाले की, मयंकला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही दिवस लागणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR