30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयओमर अब्दुल्ला यांनी भरला उमेदवारी अर्ज

ओमर अब्दुल्ला यांनी भरला उमेदवारी अर्ज

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ओमर अब्दुल्ला यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि समर्थकांसह बारामुल्लाच्या निवडणूक अधिका-यासमोर उमेदवारी अर्ज दाखल केला.

या लोकसभा जागेसाठी पीपल्स कॉन्फरन्सचे (पीसी) सज्जाद गनी लोन आणि तुरुंगात असलेले माजी आमदार अभियंता रशीद यांनी यापूर्वीच उमेदवारी दाखल केली आहे.

मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पाटीर्ने (पीडीपी) माजी राज्यसभा सदस्य फैयाज अहमद मीर यांना येथून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR