लातूर : प्रतिनिधी
श्री महेश नवमीनिमित्त लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते महेश भूषण, महेश गौरव, महेश सेवा पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिलकुमार नावंदर, लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सीए प्रकाश कासट, सचिव राजेशकुमार मंत्री, अखिल भारतीय महासभा सदस्य हुकूमचंद कलंत्री, फुलचंद काबरा, बालकिशन मुंदडा, जगदीश भुतडा, माहेश्वरी महिला संगठनच्या प्रदेश सचिव अनिता मालू, लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षा ललिता राठी, माहेश्वरी युवा संगठनचे महाराष्ट्र प्रदेश सहकारमंत्री राम भुतडा, जिल्हा युवा माहेश्वरी संगठन अध्यक्ष अभिषेक मुंदडा, शहर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोनी, युवा माहेश्वरी अध्यक्ष निकुंज भुतडा, माहेश्वरी किशोरी मंडल अध्यक्ष प्रांजळ डागा, संयोजक ईश्वर बाहेती, संतोष तोष्णीवाल, गणेश हेड्डा, राहुल लोया, अॅड. नंदकिशोर लोया, ईश्वर चांडक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘विसरत चाललेले संस्कार आणि तुटत जाणारे नाते’ या विषयावर प्रेरणादायी वक्ते अनिलकुमार नावंदर यांनी अतिशय प्रखर भाषेत आपले विचार व्यक्त केले.
यावेळी महेश सेवा पुरस्काराने रामानुज रांदड, गोवर्धनदास भंडारी, प्रा. डॉ. ईश्वरप्रसाद बिदादा, महेश गौरव पुरस्काराने जवाहरलाल धूत, भगवानदास सोनी, हभप. वीरनाथ लड्डा यांना तर महेश भूषण पुरस्काराने दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांना प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. आरती झंवर, संजीव भार्गव, प्रज्वल रांदड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या वतीने रमेश बियाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचलन चैतन्य भार्गव, डॉ. लीला कर्वा यांनी केले. प्रीती बियाणी यांनी महेश वंदना प्रस्तुत केली. दयानंद सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लातूर जिल्हा माहेश्वरी सभा, लातूर जिल्हा माहेश्वरी महिला संगठन, लातूर जिल्हा माहेश्वरी युवा संगठन, लातूर शहर माहेश्वरी सभा, लातूर माहेश्वरी महासभा, गावभाग माहेश्वरी मंडळ, महेश सेना, भाग्यनगर माहेश्वरी मंडळ, बार्शी रोड माहेश्वरी मंडळ, अपनी राधाकृष्ण गोशाळा, माहेश्वरी युगल्स, युवा माहेश्वरी, माहेश्वरी किशोरी मंडळाच्या सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.
















