लातूर : प्रतिनिधी
मुरुड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यात यावे, या मागणीसाठी लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरुड ग्रामस्थ, मुरुड नगरपरिषद संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी लातूरचे जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात मुरुडची वाढती लोकसंख्या, बिगरशेती व्यवसायाचे वाढते प्रमाण, शासकीय व निमशासकीय कार्यालयांची उपलब्धता, दळणवळणाच्या सुविधा, व्यापारी आस्थापना, विविध बँका तसेच इतर नागरी सुविधांचा उल्लेख करण्यात आला. या सर्व बाबींचा विचार करता मुरुड येथे नगर परिषद स्थापन होणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी धिरज विलासराव देशमुख यांनी राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने त्यामध्ये मुरुड नगर परिषद स्थापनेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी आग्रही भूमिका मांडली. नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने मुरुडला नगर परिषदेचा दर्जा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुरुड नगर परिषद कृती समितीचे प्रमुख डॉ. हनुमानदास चांडक, शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक पटाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. दिनेश नवगिरे, कार्याध्यक्ष मुरुड निलेश फेर, ईश्वरप्रसाद चांडक, ग्रामपंचायत सदस्य अनंत कणसे, माजी सरपंच राजेंद्र मस्के, संजय अंधारे, अमोल गाडे, महेश भोसले, जगन चव्हाण, नरसिंग पुदाले तसेच महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सारिकाताई फेरे, राणीताई खोडसे, मुरुड शहर युवक काँग्रेसचे शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष मुकेश बाबा सवासे, जयदीप सुरवसे रामराव मोरे, शिवलिंग चौधरी, विष्णू टेकाळ, कार्याध्यक्ष मुरुड प्रशांत पिंपरे, उपाध्यक्ष मुरुड सुरज कांबळे, अक्षय जाधव, उपाध्यक्ष मुरुड मोसिन मणियार, उपाध्यक्ष मुरुड चैतन्य पटाडे, समाधान गायकवाड, बालाजी सवासे, गणेश जाडकर, आकाश देडे, विनोद पुदाले, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई भिसे, ट्वेन्टीवन शुगरचे व्हाइस चेअरमन विजय देशमुख, पंचायत समिती उपसभापती महेश चव्हाण, रेणापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद कापसे, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष उमेश बेद्रे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय टेकाळे, दत्ता शिंदे, माणिक गायकवाड, धनंजय देशमुख, महादेव मस्के, श्रीकांत माने, दीपाली आदमाने, शिवानंद पाटील, तानाजी जाधव, गुरुनाथ गवळी, अक्षय देशमुख, सत्यनारायण पाटील, प्रवीण पाटील, बाळासाहेब कदम, जनक गायकवाड, अमोल देडे, संतोष स्वामी, गणेश ढगे, बापू चव्हाण, नामदेव उफाडे, नितीन जाधव इत्यादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
















