33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरमहोत्सव पशुपक्षी, अश्व व श्वान प्रदर्शनाचे आयोजन

महोत्सव पशुपक्षी, अश्व व श्वान प्रदर्शनाचे आयोजन

लातूर : प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर महाशिवरात्री महोत्सवानिमित्त लातूर जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग आणि लातूर पंचायत समिती यांच्या संयक्त्त विद्यमाने १९ मार्च रोजी पशुपक्षी प्रदर्शन, तर २० मार्च रोजी अश्व व श्वान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यासाठी त्या-त्या दिवशी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत नोंदणी आणि त्यानंतर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवालय परिसरात हे प्रदर्शन होईल.
पशुसंवर्धनामध्ये सहभागी होण्यासाठी पशुधनाचे लंपी चर्मरोगाचे रोगप्रतिबंधक लसीकरण केल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र नोंदणीपूर्वी सादर करणे बंधनकारक राहील. त्याशिवाय नोंदणी केली जाणार नाही. पशूच्या कानाला १२ अंकी पशु आधार क्रमांक असणे बंधनकारक आहे. प्रत्येक गटातील पशुधनास प्रथम, द्वितीय, तृतीय व अ, ब, क, ड अशाप्रकारे बक्षीस वाटप करण्यात येईल. प्रत्येक गटात दहा पशुधनाचा सहभाग बंधनकारक राहील अन्यथा तो गट होणार नाही व त्या गटातील पशुधनास ग्रेडप्रमाणे अ, ब, क, ड याप्रमाणे बक्षीस वाटप करण्यात येईल. सर्व सहभागी पशुपालकांना बक्षीसाची रक्कम आरटीजीएसद्वारे अदा करण्यात येईल. त्यासाठी नोंदणी करतांना पशुपालकांचे आधारकार्ड व बँक पासबुक सुस्पष्ट झेरॉक्स, लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र व पशुधंनाचा दाखला देणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत बक्षिसाची रक्कम ही रोख स्वरुपात दिली जाणार नाही.
पशुपालकांनी आपली बहुमोल पशुधन व्यवस्थित दोरखंडाने बांधुन आपल्या जबाबदारीने आणावे.  निवड प्रक्रिया ही पारदर्शक असून निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहील. निवड समितीमधील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत अथवा वाद घालणे, यासारखा अनुचित प्रकार आढळल्यास संबंधित पशुपालकांची नोंदणी रद्द करण्यात येईल. श्वान गटातील जातनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय येणा-या श्वानास प्रमाणपत्र व मेडल देण्यात येईल, असे लातूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR