37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कव्हा येथील चेअरमन सुदाम रुकमे, उपसरपंच किशोर...

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी कव्हा येथील चेअरमन सुदाम रुकमे, उपसरपंच किशोर घार, रमाकांत बरुरे यांच्या निवासस्थानी दिली भेट

लातुर प्रतिनिधी :
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दि. ७ एप्रिल रोजी दुपारी लातूर तालुक्यातील कव्हा येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुदाम रूकमे, उपसरपंच किशोर घार व रमाकांत बरूरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.

यावेळी उपस्थीत कव्हा येथील ग्रामस्थांशी संवाद साधून लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेसचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सर्जेराव मोरे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ लातूरचे संस्थापक अध्यक्ष गोविंद घार, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम रुकमे, हनमंत बरुरे, भागवत बरुरे, महादेव रुकमे, सुंदर पाटील कव्हेकर, सिकंदर पटेल, भानुदास घार, युनूस मोमीन, व्यंकटेश पुरी, रमेश सूर्यवंशी आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी रूकमे, घार व बरूरे कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR