34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिव..तर मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवू

..तर मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवू

धाराशिव : भाजपाचे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणाजगजित सिंह पाटील यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांना महायुतीने धाराशिव लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मात्र, धाराशिवची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे गेल्याने अर्चनाताईंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. आ. राणाजगजितसिंह पाटील मात्र भाजपमध्येच आहेत. पक्षांतराच्या या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मिडीयावर एक कार्टुन प्रचंड व्हायरल झाले आहे.
त्यामध्ये एक महिला पतीला म्हणते की, अहो..बगाकी लेकरालाबी एक पक्ष..,मुलगा वडीलांना म्हणतोय…पप्पा आई राष्ट्रवादीत, तुम्ही बाजपात, तर मी कोणत्या पक्षातून विधानसभा लढवू… वडील मुलाला म्हणतात.. तु कळंब-धाराशिव मधून हेतनाथ सेनेकडून लढ आं बेटा… हे कार्टुून सध्या फेसबुक, व्हॉटसअप, इंस्टाग्राम आदी सोशल माध्यमावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

आ. राणाजगजितंिसह पाटील भाजपमध्ये, त्यांच्या पत्नी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे विरोधकांनी आ. पाटील यांच्या कुटुंबाला उद्देशुन हे कार्टुन तयार केल्याचे स्पष्ट होत आहे. हे लोक सत्तापिपासू असल्याने सत्तेसाठी काहीही करू शकतात, असा आरोप खा. ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. एकमात्र खरे, हे कार्टुन अनेकांना भावले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR