मोशी दुर्घटनेप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या दोन अधिका-यांवर गुन्हा

पुणे : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेमध्ये ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या सर्वांच्या मृत्यूला जबाबदार असणा-या कंपनीविरोधात आणि सुरक्षा अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपोमध्ये कच-याचा डोंगर कोसळून ही दुर्घटना घडली होती. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेले दोन्ही आरोपी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.

ठेकेदार कंपनी अँटोनी लारा रेन्युएबल कंपनीचा प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय ५९) आणि सुरक्षा अधिकारी विजय रामराव सपकाळ (वय ३८) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांवर ९ कामगारांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा तसेच १२ कामगारांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत झाल्याप्रकरणी निष्काळजीपणा या कलमांतर्गत भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता सोहन मधुकर निकम यांनी फिर्याद दिली.

कचरा डेपोमध्ये साठणा-या कच-यावर पावसाळ्यामुळे काय धोका निर्माण होऊ शकतो? पावसामुळे कचरा डेपो ढासळू शकतो, तसेच याबाबतचे संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीची असताना आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना न केल्याने जीवितहानी झाल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार तपास करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50

Latest news