30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeलातूरराजर्षी शाहू महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद समितीची भेट

राजर्षी शाहू महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद समितीची भेट

लातूर : प्रतिनिधी
येथील शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे राजर्षी शाहू महाविद्यालयास दि.  ३ व ४ मे रोजी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) त्रिसदस्यीय समितीने भेट दिली. या समितीत अध्यक्ष कुलगुरु डॉ. कुलदीप शर्मा, हिमालयान विद्यापीठ, इटानगर(अरुणाचल प्रदेश), समन्वयक डॉ. जयराज आमीन, मंगलोर विद्यापीठ, मंगलोर (कर्नाटक) व डॉ. सिद्धार्थ सिंग बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी (उत्तर प्रदेश) हे होते. या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन तेथील त्या त्या विभागातील शैक्षणिक कार्याचे मूल्यमापन केले.
अध्ययन प्रक्रिया, महाविद्यालयाची मागील पाच वर्षाची शैक्षणिक प्रगती, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यार्थीभीमुख उपक्रम, विद्यार्थ्यांकरिता सोयी, सुविधा, अभ्यासक्रमाचे विकल्प, उच्च शिक्षणाकडे जाणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण, स्वयंरोजगार व नोकरीकडे वळणा-या विद्यार्थ्यांची प्रमाण या बाबींचा तसेच महाविद्यालयाची संख्यात्मक व गुणात्मक प्रगतीची तपासणी केली. तसेच सायंकाळच्या संगीत विभाग, क्रीडा विभाग आणि सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या विविध कलाविष्काराला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) त्रिसदस्यीय  समितीने भरभरुन दाद दिली. दुस-या दिवशी बायोटेक विभाग व महाविद्यालयाचे इंडोरस्टेडियम व भव्यदिव्य जलतरण तलावाची पाहणी केली.
एक्झिट मिटींगच्यावेळी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी समितीचे आभार मांडताना समितीतील सदस्यांच्या स्वभावाच्या अनुरुप छटा उत्तम पध्दतीने सांगितल्या. नॅक संदर्भातले सर्व कार्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव, गोपाळ शिंदे, अ‍ॅड. एस. टी. मनाळे, सदस्य डॉ. आर. एल. कावळे, बब्रुवान गोमसाळे, अ‍ॅड. सुनील सोनवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उप-प्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे, डॉ. अभिजीत यादव, डॉ. ओमप्रकाश शहापूरकर, डॉ. अनुजा जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्य सुरळीतपणे पार पडले. या यशस्वीतेसाठी पालक, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR