29.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयरायबरेली आणि अमेठीत सस्पेन्स कायम

रायबरेली आणि अमेठीत सस्पेन्स कायम

काँग्रेसकडून कोण लढणार? राहुल गांधी पराभवाचा वचपा काढणार का?

अमेठी : उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी झाले असून दुस-या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी झाले. परंतु अमेठी आणि रायबरेली या जागांवर कोण निवडणूक लढवणार हे काँग्रेसकडून अद्याप स्पष्ट झालेले नाही. उत्तर प्रदेश, रायबरेली आणि अमेठी या व्हीव्हीआयपी लोकसभा जागांसाठी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार यावर अजूनही सस्पेंस आहे.

याचदरम्यान, काँग्रेस नेते दीपक सिंह यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. अमेठी आणि रायबरेलीमधून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीबद्दल विचारले असता, काँग्रेस नेते दीपक सिंह म्हणाले की आम्हा सर्वांना विश्वास आहे की राहुल गांधी, प्रियंका गांधी येतील आणि भाजपाचा पराभव करतील. एकीकडे सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर रायबरेलीमध्ये चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना याच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान दिले आहे.

काँग्रेस रायबरेलीतून कोणाला तिकीट देणार?
सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढवल्यानंतर रायबरेलीमध्ये त्यांच्या जागी कोण निवडणूक लढवणार याची चर्चा रंगली होती. मात्र त्यांची जागा कोण घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून रिंगणात उतरवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र प्रियंका गांधी यांनीही नकार दिल्याचे बोलल्या जात आहे.

२० मे रोजी होणार मतदान
अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेसचा बालेकिल्ल्या मानल्या जात होत्या, पण २०१९ च्या निवडणुकीत स्मृती इराणींनी या जागेवर राहुल गांधींचा पराभव केला. तर काँग्रेसने या जागेवरील उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि या जागेवरूनही ते उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात असे मानले जात आहे. अमेठीमध्ये उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख तीन मे आहे. अमेठी मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. तर रायबरेलीच्या जागेवरही २० मे रोजी मतदान होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR