33.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeलातूरमहायुतीचा खासदार निवडून द्या औशाच्या विकासासाठी आणखी गती मिळेल 

महायुतीचा खासदार निवडून द्या औशाच्या विकासासाठी आणखी गती मिळेल 

औसा शहराच्या विकासासाठी आणखी १०४ कोटींचा आराखडा तयार

औसा : संजय सगरे

महायुती च्या रुपाने आज भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – मनसे – रासप एकाच व्यासपिठावर आम्ही सर्वजण एकत्र आलो असून राजकारणाल एक नवी दिशा मिळाली आहे.पाशा पटेल यांच्या साक्षीने डॉ अफसर शेख व माजी मैत्री झाली असून हि मैत्री अफसर शेख यांनी निभवायची आहे. औसा शहराच्य विकासासाठी आतापर्यंत मी चारशे कोटींचा निधी मंजूर करून आणला असून यापुढे शहराच्या विकासासाठी आणखी १०४ कोटींचा आराखडा तयार आहे.आणि लवकरच हा विकासनिधी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून जाणार आहोत त्यामुळे महायुती च्या उमेदवार सौ अर्चनाताई खासदार म्हणून निवडून आल्यावर औशाच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ औसा शहरातील आझाद चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी आमदार अभिमन्यू पवार पुढे बोलत होते की औसा शहराच्या पाणीपुरवठा योजना देताना याठिकाणी नगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे. हे कधीही पाहिले नाही देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून औसा शहराला निम्न तेरणा धरणातून पाणीपुरवठा योजनेला ४५ कोटी रुपये मंजूर करून दिले त्यामुळे शहराची पाणीटंचाई दूर झाली आहे. ४५ कोटींच्या या योजनेला पुन्हा अजित पवार यांनी ६ कोटी रुपये दिले यामुळे आम्ही संयुक्तपणे हि योजना आणली. विकास निधी देताना जात – धर्म बघत नाही औसा शहरात निधी देताना मुस्लिम भागातील विकासासाठी ८ कोटींचा निधी दिला आहे. क वर्ग नगरपालिका असणाऱ्या औसा नगरपालिकेला भरघोस निधी उपलब्ध करून देत आज तिसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरण काम सुरू झाले आहे. याचबरोबर ज्या रिकाम्या जागा अतिक्रमण काढले औशाच्या विकासासाठी अतिक्रमण काढले होते. हे कोणाचे वाईट व्हावे हा उद्देश नाही. औशात लवकरच नवे व्यापारी संकुल उभे करून या लोकांना प्राधान्याने दुकाने दिले जातील त्यामुळे औशाचा विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत.असे सांगून राजकारणात कोणी कायमचा मित्र अथवा शत्रू नसतात आजचा प्रवाहांनी डॉ अफसर शेख व मला एक घेऊन आला असून आज औशाचे डॉ अफसर शेख व किरण उटगे हे दोन्ही नगराध्यक्ष एकाच व्यासपिठावर आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात औशाच्या विकासासाठी काहीही कमी पडणार नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांना निवडून आणायची जबाबदारी आपल्यावर आहे.

नरेंद्र मोदी गरिब कुटुंबातून येत असल्याने देशात गरिब कल्याणाच्या योजना राबवल्या जात आहेत. गरिबांना मोफत धान्य, गरजू लोकांना घरकुल, शेतकऱ्यांना सन्मान निधी, घरोघरी शौचालये, उज्वला गॅस योजना आदी योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिला जात आहे.त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुती च्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी बोलताना केले आहे. यावेळी व्यासपीठावर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने,भाजपचे जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष डॉ अफसर शेख,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, माजी नगराध्यक्ष किरण उटगे,सुनील उटगे, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, काकासाहेब मोरे, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे, शहराध्यक्ष प्रदिप मोरे, युवराज बिराजदार, अक्रम पठण, इम्रान सय्यद, बंडू कोद्रे, फिरोज पठाण, माधव परिहार, नसीर कुरेशी, शिव मुरगे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR