26.6 C
Latur
Wednesday, March 4, 2026
Homeमहाराष्ट्र‘लाडकी’ पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांचा स्पष्ट नकार

‘लाडकी’ पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांचा स्पष्ट नकार

संघटनेच्या पदाधिका-यांचा नकार

मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करावी लागणार आहे. दरम्यान, आता अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन पडताळणी करण्यास नकार दिला आहे. अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी करूनही त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी होती. केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने हा घोळ झाल्याचे लक्षात आले आहे. त्यानंतर आता लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत. दरम्यान, आता अंगणवाडी सेविकांनी याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.

अंगणवाडी सेविकांनी सांगितले की, आम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशनचे काम देऊ नका. अंगणवाडी सेविकांना याआधीचेच मानधन जमा झालेले नाही. त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी हा निर्णय घेतला आहे.

अंगणवाडी सेविकांनी महिला व बालविकास अधिका-यांना पत्र लिहिले आहे. याबाबत त्यांनी म्हटले की, अंगणवाडी सेविकांनी महिलांना फॉर्म भरण्यास मदत केली आहे. या एका अर्जामागे अंगणवाडी सेविकांना ५० रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले होते. परंतु हे पैसे अंगणवाडी सेविकांना मिळाले नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका मानधनासाठी फे-या घालत आहेत. सेविकांनी काम केले आहे. मात्र त्यांना पैसे मिळण्यास उशीर होत आहे.

लाभार्थी महिलांची नाराजी
अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने म्हटले आहे की, केवायसी करताना महिलांचे व्हेरिफिकेशन एकदा झाले आहे. मात्र, दुस-यांदा फिजिकल व्हेरिफिकेशन करायला गेल्यावर लाभार्थी महिलांची नाराजी व्यक्त होईल. त्यामुळे आम्हाला हे काम देऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR