लातूरची गुणवत्ता बावन्नकशी सोनेच!

लातूर : प्रतिनिधी
कधी नव्हे ते ‘नीट’ पेपरफु टी प्रकरणात लातूरचे नाव आले आणि ब्रँडनेम ‘लातूर पॅटर्न’च्या भोवती संशयाचे वलय निर्माण झाले. पेपरफु टीमुळे चक्क परीक्षाच रद्द करावी लागली होती. पेपरफु टीच्या डागामुळे विद्यार्थी व पालकांचा विश्वास डळमळीत होतो की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, दुस-यांदा ‘नीट’ची परीक्षा घेण्यात आली आणि या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परीक्षेच्या निकालाने लातूरची गुणवत्ता बावन्नकशी सोनेच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
खरे पाहिले असता ‘लातूर पॅटर्न’च्या निर्मितीत खाजगी कोचिंग क्लासेसचा तिळमात्रही वाटा नाही. लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय यासह इतर महाविद्यालये तसेच उदगीर आणि अहमदपुरमधील काही शाळा व महाविद्यालयांनी खुप मेहनतीने ‘लातूर पॅटर्न’घडवला. मुळात ‘नीट’ पेपरफु टी प्रकरण घडले ते कोचिंग क्लासेसचालकांकडून. त्यामुळे गुणवत्तेचा ‘लातूर पॅटर्न’ आणि ‘नीट’ पेपरफु टी प्रकरण याचा दुराव्यानेही संबंध येत नाही. मात्र, ‘नीट’ पेपरफु टी प्रकरणानंतर ‘लातूर पॅटर्न’कडे संपूर्ण देशाने संशयाने पाहिले. परंतु, दूस-यांदा घेण्यात आलेल्या ‘नीट’च्या परीक्षेत लातूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत ‘लातूर पॅटर्न’ची बावन्नकशी गुणवत्ता सिद्ध करुन दाखवली आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या विश्वासाच्या बळावर विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवत ‘लातूर पॅटर्न’ची विश्वासार्हता कायम ठेवली आहे. गुणवत्तेच्या जोरावर ‘लातूर पॅटर्न’ उभा राहिला आणि तो गुणवत्तेच्याच बळावर पुढे जाईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यरांनी तसेच पालकांनी व्यक्त केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राधिका पाटील यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी घेतली भेट
05:32
Video thumbnail
Latur|मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल;शेकडो एकर शेती अजूनही पेरणीविना
02:47
Video thumbnail
EXPLAINER | कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ? महाराष्ट्रात पावसाचं असं चित्र का?
03:22
Video thumbnail
Solapur|केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी DYFIचे अन्नत्याग आंदोलन
02:26
Video thumbnail
MNS Andolan|स्मार्ट मीटरची मनसेकडून होळी; सरकारविरोधात संताप
03:13
Video thumbnail
Latur Murder|लातूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार; २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:24
Video thumbnail
Shashikant Shinde|"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत" – शशिकांत शिंदे
04:10
Video thumbnail
Nanded Teacher sucide|धक्कादायक! शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; स्टेटसमध्ये वरिष्ठांवर गंभीर आरोप
03:56
Video thumbnail
संत गजानन महाराजांच्या पालखीचे तुळजापुरात भक्तिमय वातावरणात आगमन; जिल्हाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत
01:54
Video thumbnail
Nanded|MPSC ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
00:30
Video thumbnail
Ramdas Athawale ON Sharad Pawar|शरद पवारांनी NDA मध्ये यावे, स्वागतच करू" – आठवले
11:50
Video thumbnail
Latur|द्रोणा डिफेन्स अकॅडमीविरोधात मनसेचे आंदोलन
03:19
Video thumbnail
Latur Doctar Suicide|डॉ. मेहुल राठोड मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट!
02:49
Video thumbnail
Latur|पिस्तुल्या महाराजाचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढला!
02:05
Video thumbnail
Nanded|पाण्यासाठी महिलांचा एल्गार; घागर घेऊन ग्रामपंचायतीवर धडक!
00:32

Latest news