लातूरच्या राजकारणातील ‘तात्या’ हरपले

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि शहराच्या राजकीय व सामाजिक पटलावरील एक सर्वसमावेशक नेतृत्व सुरेश (तात्या) निवृत्तीराव पवार यांचे आज, रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण लातूर शहरावर शोककळा पसरली आहे. एका अत्यंत मनमिळावू आणि जनसामान्यात प्रेमळ प्रतिमा असलेल्या नेत्याच्या जाण्याने, लातूरकरांनी आपल्या परिवारातील सदस्य गमावल्याची भावना निर्माण झाली आहे.
सुरेश तात्या पवार यांनी लातूरच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांनी लातूर नगरपालिकेत दीर्घकाळ नगरसेवक म्हणून काम केले होते. त्यानंतर लातूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर त्यांनी पहिले उपमहापौर आणि २०१७ मध्ये महापौर म्हणून शहराची धुरा सांभाळली. आपल्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या मूलभूत प्रश्नांवर भर देत लातूरकरांची उत्तम सेवा केली होती. राजकारण करत असताना त्यांनी कधीही सर्वसामान्य लोकांपासून अंतर राखले नाही, ज्यामुळे ते अबालवृद्धांमध्ये ‘तात्या’ या नावाने अत्यंत लोकप्रिय होते.
हसतमुख स्वभाव आणि सामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाण्याची वृत्ती यामुळे त्यांनी समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता लातूर येथील मारवाडी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|RCC क्लासेसवर पुन्हा CBI ची धाड;तपासाचा फास आणखी आवळला
01:54
Video thumbnail
मानवत तालुक्यात डिझेल भरण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कॅनने एकमेकांना झोडपले, व्हिडिओ व्हायरल!
00:49
Video thumbnail
जळकोट तालुक्यात एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा; सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
01:15
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05

Latest news