Homeलातूरलातूर जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस सिलेंडर संपले!

लातूर जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस सिलेंडर संपले!

लातूर : प्रतिनिधी
अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या १५ दिवसांपासून भयंकर युद्ध सुरु आहे. आखाती देशांत युद्धाची आग धुमसत असल्याने भारताला होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायुचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायु आणि व्यावसायिक गॅस सिलेंडचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा लातूर जिल्ह्यावरही परिणाम झाला असून आजघडीला लातूर जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर पुर्णत: संपले आहेत.
लातूर जिल्ह्याला दररोज २० हजार घरगुती गॅस सिलेंडची गरज पडते. सद्या ५३ हजार घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. हे सिलेंडर किमान तीन दिवस पूरतील. घरगुती गॅस सिलेंडरच्या गाड्या नियमित येत आहेत. त्यामुळे अद्यापतरी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. परंतू, व्यावसायिक गॅस सिलेंडर पुर्णत: संपले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी दिली.
गॅस सिलेेंडरअभावी व्यवसाय अडचणीत 
लातूर जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस सिलेंडर पूर्णत: संपले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा अधी होईल, याबाबत कसल्याही सूचना अद्यापतरी प्राप्त नाहीत. त्यामुळे गॅस सिलेंडरअभावी लातूर जिल्ह्यातील हॉटेलस्सह इतर व्यावसाय अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR