33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नववी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नववी यादी जाहीर

आतापर्यं ४१२ उमेदवारांना दिली उमेदवारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नववी यादी जाहीर केली आहे. यामध्ये दामोदर अग्रवाल यांना राजस्थानच्या भिलवाडा लोकसभा मतदारसंघातून तिकिट देण्यात आले आहे.

यापूर्वी भाजपने काल आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली होती. यामध्ये पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलचे तिकिट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी हंसराज हंस यांना तिकिट देण्यात आले.

५४३ सदस्यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत ४१२ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने पहिल्या यादीत १९५, दुस-या यादीत ७२, तिस-या यादीत ९, चौथ्या यादीत तामिळनाडूतील १४ आणि पुद्दुचेरीतील १ उमेदवारांची घोषणा केली होती. तर पाचवी यादी २४ मार्चला जाहीर करून १११ उमेदवारांची घोषणा केली होती. यात भाजपने पीलीभीतमधून वरुण गांधी यांचे तिकिट रद्द केले होते.

भाजपने २६ मार्चला सहावी यादी जाहीर करून तीन, सातव्या यादीत दोन आणि आठवी यादी ३० मार्च रोजी जाहीर केली होती. यात त्यांनी अभिनेता सनी देओल याचे तिकिट कापले होते. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जून दरम्यान सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR