23.4 C
Latur
Tuesday, February 24, 2026
Homeमनोरंजनवर्षा उसगांवकर यांचा धावत्या मेट्रोमध्ये रॅम्प वॉक

वर्षा उसगांवकर यांचा धावत्या मेट्रोमध्ये रॅम्प वॉक

मुंबई : प्रतिनिधी
मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर कायम आपल्या अभिनयासाठी चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्यांनी ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये देखील भाग घेतला होता. त्यांचा घरातील खेळ चाहत्यांना खूप आवडला. अशात आता वर्षा उसगांवकर यांचा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्या मेट्रोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहेत.

नागपूरमध्ये चालत्या मेट्रोमध्ये फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी उपस्थिती लावली. त्यांचा रॅम्प वॉक करतानाचा व्हीडीओ समोर आला आहे.

फॅशन शोसाठी वर्षा उसगांवकर यांनी सुंदर पिवळ्या आणि काळ्या रंगाची साडी नेसली होती. मोकळे केस, मिनिमल मेकअप, गोल्डन ज्वेलरी घालून त्यांनी लूक पूर्ण केला होता. चालत्या मेट्रोमध्ये रॅम्प वॉक करताना त्याचा आत्मविश्वास कमालीचा होता. तसेच त्यांनी रॅम्प वॉक करताना प्रवाशांशी संवादही साधला. त्यांच्या चेह-यावर सुंदर हास्य पाहायला मिळाले. चाहते आता वर्षा उसगांवकर यांच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR