वारक-यांच्या २ गाड्या इंद्रायणीच्या पुरात अडकल्या

परभणी : आषाढी वारीसाठी आळंदी येथे गेलेल्या परभणी तालुक्यातील वडगाव सुक्रे येथील वारक-यांना इंद्रायणी नदीच्या पुराचा मोठा फटका बसला आहे. आळंदीत झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने दि.६ जुलै रोजी ठाकूरबुवा मठ परिसरात पुराचे पाणी शिरले.

या पुरात वारक-यांसाठी नेण्यात आलेले किराणा साहित्य, अन्नदानासाठी जमा केलेली रोख रकमेचे नुकसान झाले असून २ बोलेरो पिकअप गाड्या मागील ३६ तासांपासून पुरात अडकल्या आहेत. यामुळे वारक-यांचे मोठे नुकसान झाले असून या गाड्यांमध्ये कुणीही नसल्याने सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
पुणे शहरासह आळंदीत मुसळधार पाऊस कोसळत आहे.

त्यामुळे आळंदीत इंद्रायणीच्या नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. या पुराच्या पाण्यात सोपान अशोकराव सुक्रे (रा. वडगाव सुक्रे) यांची (एम.एच. ३८ ई २५९३) क्रमांकाची बोलेरो पिकअप, माऊली सूर्यभान कोपनर यांची बोलेरो पिकअप (एम.एच. ४४ यू ४४३९) अशा २ पार्कींग केलेल्या गाड्या पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. त्यामुळे या गाड्यातील अन्नधान्य व पैशाचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे वारकरी आणि वाहन चालकांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने ठाकुरबुवा मठ परिसरात अडकलेल्या वारक-यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम हाती घेतले आहे. पुरात अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली असून युध्दपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

आषाढी वारीसाठी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणलेले अन्नधान्य, किराणा साहित्य आणि अन्नदानासाठी जमा केलेली रक्कम पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने वारक-यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. यामुळे वारक-यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वारकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका; लातूरमध्ये अवैध सावकारांविरोधात विशेष मोहीम
02:47
Video thumbnail
Latur|लातूरच्या क्रीडा संकुलात लाखो लिटर पाणी वाया; प्रशासन झोपेत?
02:36
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेच्या पहिल्याच जीबीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांना 'नो एन्ट्री'!
02:20
Video thumbnail
Latur|आयोध्या प्रकरणाचे पडसाद लातुरात; काँग्रेसचे आंदोलन
05:18
Video thumbnail
Latur|लातुरात भारतीय दलित पँथर आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन
03:58
Video thumbnail
इंद्रायणीला पूर: आळंदीतील चारही पूल पाण्याखाली; भाविकांना आळंदीत न येण्याचे देवस्थानचे आवाहन!
01:12
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
01:23:37
Video thumbnail
Latur|नांदेडमध्ये धाडसी आजीची कमाल; हातात साप घेऊन पोहोचल्या डॉक्टरांकडे
01:48
Video thumbnail
Latur|'उपवर्गीकरण होऊ देणार नाही!' लातुरात निळ्या वादळाचा सरकारला थेट इशारा
02:47
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|उपवर्गीकरणाविरोधात ५८ जाती एकवटल्या; लातूरमध्ये ऐतिहासिक मोर्चा
02:01
Video thumbnail
Latur|रेणापूर तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे आंदोलन
01:25
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
02:41
Video thumbnail
Latur|फुटबॉलसाठी लातूर सज्ज... सुरू झाली आंतरराष्ट्रीय मैदानांची उभारणी!
03:59
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
06:53

Latest news