वारक-यांसाठी मोठी खुशखबर! : पंढरपुरात मटण-मास विक्रीवर प्रशासनाची कडक बंदी

पंढरपूर : प्रतिनिधी
आषाढी वारीसाठी पंढरपुरात विठू माऊलीच्या दर्शनाला येणा-या लाखो वारक-यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात उद्यापासून (१५ जुलै) थेट २९ जुलै पर्यंत असे १५ दिवस मांस आणि मटण विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिका-यांनी हे कडक आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पंढरपुरातील खवय्यांची अडचण होणार असली, तरी लाखो वारकरी आणि भाविकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे.

आषाढी यात्रेच्या काळात दररोज लाखो वारकरी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पायी चालत येत असतात. या पवित्र काळात शहरातील विविध भागांत सुरू असणा-या मांस आणि मटण विक्रीमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिका-यांनी जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, पुढील १५ दिवस म्हणजेच १५ जुलै ते २९ जुलै या वारीच्या काळात पंढरपूर शहर आणि परिसरात कुठेही मांस किंवा मटणाची विक्री करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

पाच नव्या को-या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस!
एकीकडे मटण विक्रीवर बंदी असताना, दुसरीकडे पंढरपूरकडे येणा-या वारक-यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी एसटी महामंडळाने पावले उचलली आहेत. आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूर आगाराला ५ नव्या को-या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मिळाल्या आहेत. या सर्व बसेसचे लोकार्पण पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.

लाखो भाविकांची वाहतूक सुरक्षित
याप्रसंगी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी विश्वास व्यक्त केला की, वारीच्या काळात वारकरी भक्तांना उत्तम आणि दर्जेदार सेवा-सुविधा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. यात्रेपूर्वी पंढरपूर आगाराला महामंडळाकडून अजून काही नवीन बसेस मिळणार आहेत. लाखो भाविकांची वाहतूक सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. या नवीन गाड्यांमुळे विठ्ठल भक्तांचा वारीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51
Video thumbnail
Nanded|नांदेड पूल कोसळल्याप्रकरणी केंद्रीय पथकाची तपासणी; तांत्रिक त्रुटींचे प्राथमिक संकेत
01:33
Video thumbnail
परभणीत महिला बचत गटांचे आमरण उपोषण; २ महिलांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
01:50

Latest news