40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरवाहतूक कोंडीमुळे अक्कलकोटवासियांसह भाविकांमधून संताप

वाहतूक कोंडीमुळे अक्कलकोटवासियांसह भाविकांमधून संताप

अक्कलकोट- अकलकोट तीर्थक्षेत्र स्वामी समर्थांचा पदस्पर्श, लिला यांनि पावन झालेली भूमी आहे. येथे स्वामींची अनेक मठ-मंदिरे आहेत. वर्षभरात अनेक उत्सव साजरे होतात. पालखी मार्गावरून भव्य-दिव्य मिरवणूक निघतात. पण वारंवार होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसह भाविकांना मोठा त्रास होतो. जीव मुठीत घेऊन भाविकांचा वावर होतो. दिवसेंदिवस तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यामुळे तातडीने पालखी मार्ग संदीकरण करावे अशी मागणी व्यक्त होत आहे. एकंदरित स्वामी समर्थांच्या नगरीतील वाहतूक कोंडी हटविण्यासाठी प्रशासनच असमर्थ असल्याचे वारंवार समोर येत आहे.

अक्कलकोट तीर्थक्षेत्री वर्षभरात स्वामी समथांचा प्रकटदिन, पुण्यातिथी महोत्सव, श्री दत्त जयंती, गुरुप्रतिपदा, गुरुपौर्णिमा उत्सव, त्रिपुरारी पोर्णिमा यासह ग्रामदैवत मल्लिकार्जुन यात्रा व अन्य शहरातील उत्सव, जयंती, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात. याकरिता मोठ्या प्रमाणात भाविक येतात. याशिवाय हल्ली गुरुवार, शनिवार, रविवारी, पोर्णिमा, सलग सुट्ट्यादिवशी म ोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आहेत. याशिवाय गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर यात्रा काळात अक्कलकोट तीर्थक्षेत्री मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
उत्सवअसो अथवा नसो बारा महिने अक्कलकोट तीर्थक्षेत्री दर्शन, पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या तीव्र झपाट्याने वाढत आहे.घरोघरी भाविकांनी स्वामी समर्थांची लीला, कार्याची टीव्ही मालिका यामुळेही अक्कलकोट स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांचा ओढा वाढलेला आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात वाढणारी गर्दी, वाहनांची संख्या पाहता स्वामी मंदिर परिसर तसाच अरुंद आहे. रस्त्याचा मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण वाढलेले, वाहने पार्किंगसाठी अपुरी जागा, लॉजसमोर रस्त्यावरच वाहतुकीस अडथळा ठरणारी

ऑटोरिक्षा भाविकांची वाहने यामुळे मुळातच अरुंद असलेली रस्ते यामुळे अधिकच अरुंद झाली आहेत. यामुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे सध्या येणारी वाहने, भाविकांची संख्या नजरेआड करता येणार नाही. स्वामी समर्थ समाधी मठ परिसर, गुरु मंदिर परिसर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, पालखी मार्गावर तातडीने रस्ते रुंदीकरण, पार्किंग सुविधा, ऑटो रिक्षांना वाहतुकीस अडथळा नसणारे थांबे निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे.सध्या येणाऱ्या भाविकांची संख्येमध्ये झपाट्याने होणारी वाढ व भविष्यात वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेता अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी तातडीने पालखी मार्ग, रस्ते रुंदीकरण कामे हाती घेणे गरजेचे असल्याची मागणी भावीकांमधून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR