विठ्ठल… विठ्ठल..जय हरी विठ्ठल…चा दुमदुमला गजर

लातूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी लातूर शहर व परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांत भाविक, भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विठ्ठल भक्तांनी विठुरायाच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात विठ्ठल… विठ्ठल..जय हरी विठ्ठल…चा गजर दुमदुमला. दिंड्या, मिरवणुका, भजन, कीर्तनाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
माऊली  विद्यार्थी विकास केंद्र
अंबाजोगाई रोडवरील उपक्रमशील शैक्षणिक केंद्र म्हणून परिचित असलेल्या माऊली  विद्यार्थी विकास केंद्र, माऊली बालक मंदिर (सेमी इंग्लिश) माऊली इंटरनॅशनल मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी आषाढी दिंडी काढली. इरकल अंश याने विठ्ठलाची, शिंदे मनस्वी  हिने रुक्मिणीची, गुलाले गौरव याने तुकारामाची, तर दंडिमे आरूष याने ज्ञानेश्वराची वेशभूषा साकारली होती. ‘देह विठ्ठल विठ्ठल झाला’ या सुंदर गीतावर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादरीकरण केले.
दिंडीमध्ये संस्था सचिव गंगाधर आरडले, कोषाध्यक्ष तानाजी बेवनाळे पाटील,  प्राचार्या कविता आरडले, उपप्राचार्या भाग्यश्री काळे, परिसरातील भाविक, पालक, शिक्षक शिक्षिका कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाग्यश्री उबाळे यांनी केले. दिंडीच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक गोपाळ करडिले, ड्रायव्हर्स व शिक्षक, कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. जिजामाता विद्यालय  एमआयडीसी परिसरातील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणा-या भव्य वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. हडको व एमआयडीसी परिसरात काढण्यात आलेल्या या दिंडीत विद्यार्थी आणि पालकांनी विठ्ठल नामाचा आणि हरिनामाचा गजर करत संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला. या प्रसंगी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ आणि ‘आपले लातूर, सुंदर लातूर’, अशा पर्यावरणपूरक घोषणा देत विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा मोलाचा संदेश दिला. या वारकरी दिंडीचा शुभारंभ विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब सोनवणे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आला. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजर आणि विठूमाऊलीच्या जयघोषाने दिंडीचा मार्ग दुमदुमून गेला होता.
​दिंडीचे मुख्य आकर्षण ठरल्या त्या  विद्यार्थिनी रूपाली कदम आणि  नव्या कांबळे! या दोन्ही विद्यार्थिनींनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची सुरेख व उत्कृष्ट प्रतिमा साकारली होती. सुनीता भोसले या विद्यार्थिनीने अभंगावर नृत्य सादर केले. त्यांच्या या कलेचे प्राचार्य व उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. दिंडीच्या आयोजनासाठी विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार शिंदे, शंकर पांचाळ, बालासाहेब बावणे, देविदास कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा? परभणीत आंदोलकांचा जल्लोष!
02:47
Video thumbnail
Latur|माळरानावर फुलवलं नंदनवन! निवृत्त पोलिसाची शेती पाहून तुम्हीही थक्क व्हाल
03:43
Video thumbnail
Latur|सोमवारी लातूरमध्ये महामोर्चा; आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा एल्गार!
04:30
Video thumbnail
Dharmendra Pradhan|NEET पेपरफुटीचा मोठा परिणाम? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!
01:30
Video thumbnail
Latur|विठ्ठलनामाच्या गजरात महिला वारकऱ्यांची पायी वारी; शिवणी ते झळकवाडी भक्तिमय सोहळा!
00:42
Video thumbnail
'प्रति पंढरपूर' वांजरवाड्यात आषाढी एकादशीनिमित्त जनसागर; दर्शनासाठी अर्धा किलोमीटरच्या रांगा
03:23
Video thumbnail
"26 दिवस उपोषणानंतरही माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार?" – सोनम वांगचुक यांचा संतप्त सवाल
03:11
Video thumbnail
Amit Deshmukh|सरकारनं चर्चेला उशीर केला; देशाचे सगळे स्तंभ ढासळतायत - आ.अमित देशमुख
04:59
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी आणि लाठीचार्जविरोधात विद्यार्थ्यांचा ‘रॅप सॉंग’ आंदोलन
02:21
Video thumbnail
Latur|क्षयरोगमुक्त गावासाठी मोठी मोहीम; वडवळ नागनाथमध्ये विशेष निक्षय शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या दर्शनासाठी १२०० भाविकांची मोफत वारी; २५ बसने पंढरपूरकडे रवाना!
02:11
Video thumbnail
Latur|लातुरात विद्यार्थ्यांची भक्तिमय दिंडी; पाहा आनंदवारीचा जल्लोष!
04:04
Video thumbnail
PM Narendra Modi On NEET Pepar Leak|नीट पेपर फुटी प्रकरणात नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया
02:56
Video thumbnail
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पूर्णा बंद; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
06:32
Video thumbnail
Parbhani|लाठीहल्ल्याचा निषेध, परभणी बंद; बाजारपेठेत शुकशुकाट!
02:08

Latest news