नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघातील मालिका लवकरच सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना ६ जून रोजी सुरू होईल. त्यानंतर १३ जूनपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू होईल. बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाचा संघ आधीच जाहीर केला आहे. दरम्यान, अचानक एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा खेळाडू, विराट कोहली, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला असल्याचे समोर आले आहे.
विराट कोहली ब-याच कालावधीनंतर भारतीय संघाकडून खेळण्याची तयारी करत होता. मात्र, कोहली स्वत: आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. काही काळापूर्वीपर्यंत विराट कोहली आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत होता. गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोहलीने शानदार खेळी केली होती आणि आपल्या संघाला सलग दुस-यांदा विजेतेपद मिळवून देण्यात मदत केली होती.
बदली खेळाडूची घोषणा नाही
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कोहली वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे आगामी मालिकेची चमक कमी होईल. भारताचा माजी कर्णधार आता एकाच फॉरमॅटमध्ये खेळणारा खेळाडू असला तरी, तो जगभरातील चाहत्यांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. अद्याप त्याच्या बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.
















