37.7 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeराष्ट्रीयमोदींच्या निलंबनाची मागणी करणारी याचिका फेटाळली

मोदींच्या निलंबनाची मागणी करणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवदेवता आणि धार्मिक स्थळांच्या नावावर पंतप्रधान मोदी यांनी मते मागितल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिका पूर्णपणे चुकीची असून निवडणूक आयोग यासंदर्भात निर्णय घेईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशातील भाषणात ९ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर, करतारपूर साहिब कॉरिडोर तसेच गुरु ग्रंथ साहिब यांच्या प्रती अफगाणिस्तानमधून भारतात आणल्याचा उल्लेख करत मते मागितल्याच्या आरोप वरिष्ठ वकील आनंद जोंधळे यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगात तक्रारही दाखल केली होती. तसेच पंतप्रधान मोदींना ६ वर्षांसाठी निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी या तक्रारीत केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने अद्यापही यासंदर्भात निर्णय न घेतल्याने त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, आनंद जोंधळे यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी आपली बाजू मांडताना पंतप्रधान मोदी यांचे भाषण देशाचे विभाजन करणारे आहे, असा दावा जोंधळे यांनी केला.

तक्रार मिळाली, योग्य तो निर्णय घेऊ
यासंदर्भात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली असून आयोगाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे न्यायालयाने आयोगाला यासंदर्भात निर्देश द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली तर यासंदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार प्राप्त झाली असून कायद्यानुसार सर्व बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगाचे वकील सिद्धात कुमार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR