शहरातील फुटपाथ घेणार मोकळा श्वास; मनपाची विशेष मोहीम

लातूर : प्रतिनिधी
उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे व लातूर शहर महानरगपालिका  आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार शहरातील फूटपाथवरील अतिक्रमणे हटवून फुटपाथ मोकळे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे आगामी काही दिवसात शहरातील सर्व फुटपाथ मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत. अतिक्रमण विभागाच्या वतीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दयानंद महाविद्यालयाचे गेट ते ज्ञानप्रकाश शाळेसमोरील अतिक्रमण हटवून यापूर्वीच फुटपाथ खुला करण्यात आला आहे.सोमवारी दि. १० रोजी पीव्हीआर चौक ते कृष्णा मंगल कार्यालयासमोरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात याच पद्धतीने कार्यवाही करून अतिक्रमणे काढली जाणार आहेत. यामुळे फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे होणार आहेत.
शहरातील व्यावसायिक, व्यापारी, हातगाडे चालक यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी खुले करावेत. अन्यथा मनपाच्या वतीने साहित्य जप्त करून कडक कार्यवाही केली जाईल. व्यावसायिकांनी स्वत: फुटपाथ मोकळे करून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील सार्वजनिक पदपथ (फुटपाथ) अतिक्रमणमुक्त करुन नागरिकांच्या सुरक्षित पायी चालण्याच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करा तसेच केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या ‘कंप्लिट स्ट्रीट्स गाईडलाईन्स’ ची अंमलबजावणी करावी व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत वैधानिक कर्तव्य पार पाडावे, अशी नोटीस अ‍ॅड. जगन्नाथ चित्ताडे, आयुक्त मुंबई उच्च न्यायालय, लातूर यांनी लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांना बजावली आहे.
ही नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आवश्यक ती कार्यवाही करुन त्याचा लेखी अहवाल आमच्या कार्यालयास सादर करावा. जर वरील मुदतीत आवश्यक कार्यवाही करण्यात आली नाही तर संबंधित अधिका-यांविरुद्ध वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणे, न्यायालयीन आदेश, नुकसानभरपाई, खर्च व इतर योग्य दिलासा मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी महानगरपालिका आयुक्त पूर्णपणे जबाबदार राहातील.  ही नोटीस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियिम १९४९ च्या कलम ४८७ मधील तरतूदींचे पालन म्हणून देण्यात आल्याचे अ‍ॅड. जगन्नाथ चित्ताडे, आयुक्त मुंबई उच्च न्यायालय, लातूर यांनी नोटीसमध्ये नमुद केले आहे. त्यानूसार मनपा प्रशासनाने शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17

Latest news