शेतक-यांच्या खात्यावर ५ हजार टाकून सरकारकडून थट्टा

परभणी : राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे पीक हातचे गेल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशा परिस्थितीत शासनाने केवळ ५ हजार रुपये खात्यावर जमा करून शेतक-यांची थट्टा केली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांनी केली. यावेळी चटणी-भाकरी खात सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

शेतक-यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना तुटपुंजी आर्थिक मदत देऊन शासन शेतक-यांची थट्टा करत असल्याचा आरोप यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांनी केला. शेतक-यांच्या अडचणी समजून घेण्याऐवजी तुटपुंज्या मदतीच्या माध्यमातून सरकार आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतक-यांना प्रत्यक्षात भरीव आर्थिक मदतीची गरज असताना ५ हजारांची मदत म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चटणी-भाकर खाऊन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला तरी शेतक-यांपुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाने केवळ ५ हजारांची मदत देऊन सरकारने आपली पाठ थोपटून घेणे योग्य नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे यांनी घेत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, महासचिव मुजफर खान, मानवत तालुकाध्यक्ष राऊत, रंजीत मकरंद, एन.जी. खंदारे. मधुकर बनकर, अनिल राठोड, सतीश वाकळे, दिलीप मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना भरीव मदत द्यावी. शेतमालाला योग्य दर मिळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02
Video thumbnail
Purna Fire News | पूर्णा येथे सायकल स्पेअरपार्ट दुकानाला भीषण आग | ३ लाखांचे नुकसान | एकमत डिजिटल
01:15
Video thumbnail
LIVE -एकमत कार्यालयातील दिवाळी लक्ष्मीपूजन सोहळा
00:00
Video thumbnail
Latur Diwali Firecracker Market | लक्ष्मीपूजनासाठी फटाका बाजारात गर्दी | शेतकऱ्यांना 20% सूट
03:31
Video thumbnail
Latur Diwali Shopping Rush | गंजगोलाई बाजारपेठेत तुफान गर्दी | वाहतूक कोंडी | एकमत डिजिटल
02:10
Video thumbnail
Latur Vanchit Bahujan Aghadi Black Diwali | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन | एकमत डिजिटल
01:44
Video thumbnail
Jalkot Drought Diwali | दुष्काळामुळे जळकोटची दिवाळी फिकी | फुलांचे भाव घसरले | एकमत डिजिटल
02:50
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39

Latest news