ताडकळस : ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लिमला शिवारातील रामराव शिंदे यांच्या शेतात झाडाखाली तिर्रट जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सपोउपनी. नामदेव सुजलोड, राकेशसिंह ठाकुर, अमोल हिवरे, नागेश पोते यांनी छापा टाकला. या प्रकरणी ६ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पोलिसांना गंगाधर बापु दातरे (वय ५०) रा. दगडवाडी ता. पुर्णा, अशोक नामदेवराव हत्तीअंभोरे (वय ४०) रा. कमलापुर ता. पुर्णा, चुडाजी काशीनाथ गायकवाड (वय ५०) रा. मजलापुर ता. पुर्णा, बाळु बापुराव वाघमारे, रा. दगडवाडी ता. पुर्णा, संदिप बापुराव जाधव, रा. मजलापुर, ता. पुर्णा, सखाराम जाधव, रा. कमलापुर ता. पुर्णा दि. ७ रोजी ५.०० वाजताच्या सुमारास लिमला शिवारातील रामराव शिंदे यांच्या शेतात झाडाखाली तिर्रट खेळताना आढळून आले. या धाडीत रोख २२५० रुपयांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी ३ आरोपी पळून गेले असल्याची फिर्याद पो.शि. अमोल हिवरे यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनी. नामदेव सुजलोड करीत आहेत.
















